Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज! 'त्या' महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार पैसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana aditi tatkare big statement these women get benefit on saptember month mukhyamantri ladki bahin yojana scheme
लाडक्या बहिणींसाठी खूशखबर!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'त्या' महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार लाभ

point

महिन्याअखेरीस खात्यात पैसे होणार जमा

point

आदिती तटकरेंनी दिली महिलांना खूशखबर

Aditi Tatkare News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.  त्यामुळे त्या  महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. (ladki bahin yojana aditi tatkare big statement these women get benefit on saptember month mukhyamantri ladki bahin yojana scheme) 

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालूक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिबीटी करणार आहोत,असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो...1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बँक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'इतक्या' महिलांच्या खात्यात पैसे जमा

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला'', अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

''सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा'', असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी 'या' गोष्टी करा, नाहीतर 4500 रूपये विसरा?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT