Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार, पण कधी अन् किती वाजता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ladki Bahin Yojana Third Installment Date And Time
Ladki Bahin Yojana Third Installment Date And Time
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आली समोर

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना मिळणार?

point

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी अन् किती वाजता होणार जमा?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या माहिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी 1 कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दोन हफ्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्व महिलांना तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे. अशातच आता लाडक्या बहीणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हफ्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पण या योजनेचे पैसे नेमके कोणत्या तारखेला जमा होणार आहेत आणि किती वाजता? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (The latest information about Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana is coming out.more than 1 crore applications have been accepted for the scheme)

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे. ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी(DBT) एनेबल आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तिसऱ्या हफ्त्याच्या पैशांबाबत मोठी अपडेट समोर आली असून तारीख आणि वेळ निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे. 

हे ही वाचा >> Sanjay Raut : "मिंधे सेनेच्या लोकांना लेडीज बार...", आनंद आश्रमात पैसे उधळले, संजय राऊत संतापले

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता आज 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
 परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Virat Kohli vs Babar Azam: विराट कोहली की बाबर आझम? 114 इनिंगनंतर कोण आहे 'वनडे'चा किंग?

आज 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसै जमा होतील असं बोललं जात आहे. सर्व महिलांनी तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा करा. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरी अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे. काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते. अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावा आणि डीटीबी एनेबल करावं. ज्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT