Virat Kohli vs Babar Azam: विराट कोहली की बाबर आझम? 114 इनिंगनंतर कोण आहे 'वनडे'चा किंग?
Virat Kohli And Babar Azam ODI Scorecard : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांची नेहमीच तुलना केली जाते. बाबर आझम विराट कोहलीसारखाच खेळतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बाबर आझमने विराट कोहलीला मागे टाकलं?
Virat Kohli And Babar Azam ODI Scorecard : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यांची नेहमीच तुलना केली जाते. बाबर आझम विराट कोहलीसारखाच खेळतो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. बाबर आझमने गेल्या काही दिवसांमध्ये अप्रतिम कामगिरी करून अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. अशातच पाकिस्तानचा स्टार फलंदाजाला त्याठिकाणचा विराट कोहली म्हटलं जातं. त्यामुळे जाणून घेऊयात दोघांच्या धावसंख्येच्या आकडेवारीबाबत सविस्तर माहिती. (Indian Cricket Team legendary player Virat Kohli and Pakistan's star batsman Babar Azam are always compared. Babar Azam play like Virat Kohli, this is what people say)
विराट कोहली आणि बाबर आझम एका खास कामगिरीत एकाच टप्प्यावर आहेत. दोन्ही फलंदाजांच्या 114 वनडे इनिंगची आकडेवारी अशी की, बाबरने 56.7 च्या सरासरीनं 5729 धावा केल्या आहेत. त्याने 88.7 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. तर कोहलीने 114 इनिंगनंतर 52.1 च्या सरासरीनं 5005 धावा केल्या होत्या. कोहलीने 88.6 च्या स्ट्राईक रेटने धावांचा डोंगर रचला.
हे ही वाचा >> Sanjay Raut : "मिंधे सेनेच्या लोकांना लेडीज बार...", आनंद आश्रमात पैसे उधळले, संजय राऊत संतापले
'अशी'आहे ODI क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडूंची कामगिरी
विराट कोहलीने भारतीय संघासाठी वनडे फॉर्मेटमध्ये आतापर्यंत एकूण 295 सामने खेळले आहेत. कोहलीने 283 इनिंगमध्ये 58.18 च्या सरासरीनं 13906 धावा कुटल्या आहेत. वनडेत त्याच्या नावावर 50 शतक आणि 72 अर्धशतकांची नोंद आहे. कोहलीने 93.54 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. विराट कोहली
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : "अमेरिकेत जाऊन घटनेचा...", नारायण राणेंचा राहुल गांधींवर निशाणा
तर बाबर आझमने पाकिस्तानसाठी आतापर्यंत एकूण 117 वनडे सामने खेळले आहेत. आझमने 114 इनिंगमध्ये 56.72 च्या सरासरीनं 5729 धावा केल्या आहेत. वनडे फॉर्मेटमध्ये बाबरच्या नावावर 19 शतक आणि 32 अर्धशतकांची नोंद आहे. बाबरने या धावा 88.75 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. विराट कोहली आणि बाबर आझमच्या क्रिकेटच्या धावसंख्येबाबत नेहमीच वेगवेगळे अंदाज बांधले जातात. बाबरची तुलना क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पडणाऱ्या विराट कोहलीशी केली जाते. परंतु, विराटच्या संपूर्ण आकडेवारी पाहता बाबर आझमला विराटची बरोबरी करण्यात खूप मोठ्या इनिंग्ज खेळाव्या लागतील. आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये बाबरने आतापर्यंत फारशी चकमदार कामगिरी केली नाहीय.
ADVERTISEMENT