Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, सरकारने घेतला 'हा' निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana women application process majour changes mukhymantri ladki bahin yojana scheme devendra fadnavis aditi tatkare ajit pawar eknath shinde
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बदल

point

नवीन शासन निर्णय जारी

point

लाडक्या बहिणींवर नेमका काय परिणाम होणार

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासून महायुती सरकारने त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. कधी सरकारने योजनेची मुदत वाढवली तर कधी लाडक्या बहिणींना कागदपत्रांमध्ये सुट दिली होती. आताच नुकतीच सरकारने या योजनेची मुदत ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर आता पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत( Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme) मोठा बदल करण्यात आला आहे. या बदलाचा लाडक्या बहिणींवर नेमका काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana women application process majour changes mukhymantri ladki bahin yojana scheme devendra fadnavis aditi tatkare ajit pawar eknath shinde) 

राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवली होती. आता राज्य सरकारनं या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकांकडून मंजूर केले जातील, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Gold Price: बाप्पाच पावला! गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याचे दर कोसळले; पाहा आजचा 24 कॅरेटचा भाव...

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय? 

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM), मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager). आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते.  एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं.  संबंधित व्यक्तीनं  पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच सरकारने हा बदल केल्याचे बोलले जात आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather: बाप्प्पाच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा तुमच्या शहरातील IMD चा अंदाज 

आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळाला आहे. पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे.  कारण ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे,  त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT