Ladaki Bahin Yojana: अपात्र महिलांना पुन्हा संधी! लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार? फक्त...

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladaki Bahin Yojana Latest News
ladaki Bahin Yojana Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सरकार घेणार मोठा निर्णय

point

अपात्र महिलांनाही लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे?

point

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली समोर

Ladaki Bahin Yojana latest News: महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला राज्यभरातून महिलांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कारण या योजनेसाठी आतापर्यंत महाराष्ट्रातून २ कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे. राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना दोन हफ्त्याचे पैसेही देण्यात आले आहेत. या योजनेसाठी महिलांची अर्ज भरण्याची लगबग सुरुच आहे. या योजनेची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट पर्यंत होती. पात्र महिलांचा या योजनेबाबत असलेला उत्साह पाहून शिंदे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं.

ADVERTISEMENT

अर्ज करण्याची तारीख वाढणार?

लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्य सरकार अर्ज भरण्याची मुदत एक महिन्यापर्यंत वाढवू शकते. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्टनंतरही महिलांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. ग्रामीण क्षेत्रांशिवाय महाराष्ट्राच्या इतर भागात महिलांना अर्ज करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकदा प्रयत्न करूनही पात्र महिलांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

हे ही वाचा >> Vanraj Andekar Murder Case : आंदेकर टोळीचा म्होरक्या कोण? वाचा INSIDE स्टोरी 

या सर्व समस्यांना आणि पात्र महिलांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार अर्ज भरण्याची तारीख वाढवू शकतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यांत दीड कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. 

हे वाचलं का?

लाखो महिलांचं खातं आधार कार्डशी नाही लिंक 

अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. कारण या महिलांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही. जवळपास ४० ते ४२ लाख पात्र महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही. या योजनेसाठी पात्र असलेल्या २१ ते ६५ वर्षांच्या अनेक महिलांनी अर्ज केले नाहीत. या महिलांना योजनेचा लाक्ष मिळवून देण्यासाठी राज्य सरकार एक महिन्यांचा कालावधी वाढवू शकतं. यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळेल. 

हे ही वाचा >> Sharad Pawar : "शिवरायांची तुलना सावरकरांशी...", शरद पवारांनी PM मोदींना सुनावलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT