Maharashtra Weather : राज्यात पुन्हा काही भागात पावसाची शक्यता, पाहा कोणकोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

मुंबई तक

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील वातावरणात बदल होऊन, तापमानाच चढ-उतार होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

point

वातावरण बदलाणार, उकाडा वाढणार?

point

थंडीची आणखी वाट पाहावी लागणार?

राज्यासह देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. दिवे, लाईटींग लावून, फटाके फोडून आनंद साजरा केला जातोय. तर दुसरीकडे काही भागात पाऊसही हजेरी लावण्याच्या तयारीत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील वातावरणात बदल होऊन, तापमानाच चढ-उतार होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र हिवाळ्याची वाट पाहणाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा >>Amit Thackeray : शिवाजी पार्क दीपोत्सव प्रकरणी चौकशी सुरू, ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीची दखल, अमित ठाकरेंची उमेदवारी...

 

मागच्या दोन दिवसात राज्यातील काही भागात पाऊस झाला होता. त्यानंतर आता पुन्हा राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 13 ढगाळ वातावरण राहील, तर काही भागात पाऊसही होईल. तर कोकणात काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट असणार आहे. 

 

हे ही वाचा >>Arvind Sawant : उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात FIR, शायना एनसी म्हणाल्या...

राज्यात दिवाळी पाठोपाठ हिवाळ्याची चाहूल लागणार असं चित्र होतं. मात्र वातावरणातील बदलांमुळे काही भागात पावसाचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे आता थंडीची वाट पाहणाऱ्यांना आणखी काही काळ अशीच वाट पाहावी लागणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp