Mazi Ladki Bahin: ऑक्टोबर महिन्यात थेट मिळणार 3000 रुपये, 'हे' आहे खरं कारण!
Mazi Ladki Bahin 3000 Rs: ऑक्टोबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार आहेत. जाणून घ्या नेमकं काय आहे यामागचं कारण.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महिलांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार 3000 रुपये
शिंदे सरकार का देणार अॅडव्हान्स पैसे?
निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय
Mazi Ladki Bahin Yojana: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे. तिसऱ्या हप्त्यानंतर आता लवकरच चौथ्या हप्ताही मिळणार आहे, चौथ्या हप्त्याबाबत काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत, ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल. (mazi ladki bahin yojana november installment will be available only in october before diwali get 3000 rs)
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील 2.4 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले असून, त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरल्या आहेत. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : तब्बल 1 कोटी 96 लाख महिलांच्या खात्यात 4500 जमा?, तुमच्या अर्जाचं काय झालं?
ज्या महिलांनी यशस्वीपणे अर्ज केला आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले आहे अशा सर्व महिलांच्या बँक खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम राज्य सरकारने जमा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, दरम्यान, चौथ्या योजनेबाबत एक अपडेट आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण योजनेचे अॅडव्हान्स हप्ता मिळणार (Big Update Majhi Ladki Bahin Yojana Next Installment in Advance)
राज्यातील कोट्यवधी महिलांना तिसऱ्या हप्त्यापर्यंत 4500 रुपये मिळाले आहेत, तर चौथ्या हप्त्याबाबत काही खास माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली आहे. वास्तविक, जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Optical Illusion Quiz: फक्त जीनियस लोकंच या चित्रात चूक शोधू शकतात, तुम्हीही लावा जोर!
माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना चौथा हप्ता मिळणार आहे. पण तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असा दोन महिन्यांचा मिळून मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
लाभार्थी | राज्यातील गरीब महिला |
लाभ | 1500 रुपये प्रति महिना लाभ होईल |
कितवा हप्ता | चौथा हप्ता |
चौथा हप्ता कधी मिळेल? | लवकरच |
हेल्पलाइन क्रमांक | 181 |
अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
Advance मध्ये का मिळणार पैसे?
माझी लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे हे महिलांना ऑक्टोबर महिन्यातच मिळणार आहे. यामागचं मूळ कारण म्हणजे निवडणुका आहे. कारण येत्या 15 दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. ज्या नोव्हेंबर महिन्यात होणं अपेक्षित आहे. अशावेळी एकदा निवडणुका जाहीर झाल्या की, आचारसंहिता लागू होईल.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय योजना या तात्पुरत्या स्वरुपात बंद होतात. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे ऑक्टोबरमध्ये येणार आहेत.
ADVERTISEMENT