Mhada Lottery 2024 : म्हाडाचा अर्ज भरताना 'या' चुका टाळा, नाहीतर...
Mhada Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने म्हाडा लॉटरी 2024 योजनेअंर्तगत 2030 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या योजनेची अधिकृत जाहिरात 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. आणि 9 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजल्यापासून या योजनेत अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
म्हाडा लॉटरी 2024 योजनेअंर्तगत 2030 सदनिकांची सोडत जाहीर
9 ऑगस्टपासून या योजनेत अर्ज करण्यास सुरुवात
4 सप्टेंबर रात्री 11.45 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार
Mhada Lottery 2024 : मुंबई घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने लॉटरी 2024 ची घोषणा केली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा म्हाडा विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे.म्हाडाच्या या सोडतीचा लाभ घेताना तुम्हाला काही चुका टाळाव्या लागणार आहेत. या चुका कोणत्या असणार आहेत, हे जाणून घेऊयात. (mhada lottery 2024 mumbai 2030 houses avoid these mistake while apply for mhada scheme)
अर्जाची शेवटची तारीख काय?
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने म्हाडा लॉटरी 2024 योजनेअंर्तगत 2030 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या योजनेची अधिकृत जाहिरात 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. आणि 9 ऑगस्टच्या दुपारी 12 वाजल्यापासून या योजनेत अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.45 वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. आणि 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निकाल जाहीर केले जातील.
अर्जदारांची श्रेणी
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपये
अल्प उत्पन्न गट (LIG) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 9 लाख रुपये
मध्यम उत्पन्न गट (MIG) – वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 12 लाख रुपये
उच्च उत्पन्न गट (HIG) – 12 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न
हे ही वाचा : Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?
अर्ज करण्यासाठी नवीन प्रक्रिया
अर्जदाराने नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी पाठवल्यानंतरच म्हाडाच्या सोडतीचा अर्ज वैध ठरेल.
नोंदणीसाठी फक्त 7 दिवसांची डेडलाइन असेल.










