Hate Story 2 फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 14 वर्षांनंतर होणार घटस्फोट, मुलांची कस्टडी कोणाला मिळणार?
Jay Bhanushali and Mahhi Vij : Hate Story 2 फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 14 वर्षांनंतर होणार घटस्फोट, मुलांची कस्टडी कोणाला मिळणार?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Hate Story 2 फेम अभिनेत्याचा लग्नाच्या 14 वर्षांनंतर होणार घटस्फोट
मुलांची कस्टडी कोणाला मिळणार?
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल म्हणजेच जय भानुशाली आणि माही विज यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि आता त्या खऱ्या ठरल्या आहेत. जय आणि माही यांनी 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत अधिकृतपणे घटस्फोट घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
दोघांनी आपलं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, जय आणि माही यांच्यामध्ये बराच काळ खटके उडाले होते. त्यातून दोघांनी काही महिन्यांपूर्वी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गेल्या काही महिन्यांपासून ते स्वतंत्र राहत होते, आणि आता त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
जुलै महिन्यातच सुरु झाल्या होत्या घटस्फोटाच्या चर्चा
जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या अफवा यावर्षी जुलैमध्येच ऐकायला मिळत होत्या. त्या वेळीच दोघांनी घटस्फोटाच्या कागदांवर सही केल्याचे म्हटले गेले होते. जुलै-ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी दोघांनी वैवाहिक नाते सहमतीने संपवले. दोघांनी एकत्र येऊन संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मनोमिलन न झाल्याने अखेरीस विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला.
हेही वाचा : पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार अखेर रद्द, बिल्डर विशाल गोखलेंनी मेल पाठवला; आता रवींद्र धंगेकर म्हणाले...










