एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती रुपये कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर
Petrol pump owners earning : एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती रुपये कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक लिटरमागे पेट्रोल पंप मालक किती कमावतो? संपूर्ण गणित एका क्लिकवर
पेट्रोल पंप सुरू करण्याचा खर्च किती?
Petrol pump owners earning : देशभरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने इंधन विक्रीचा व्यवसायही प्रचंड गतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप (Fuel Pump) हा व्यवसाय आज ग्रामीण ते शहरी भागात स्थिर आणि नफा देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. मात्र, पेट्रोल पंप सुरू करणे हे सहज शक्य नसते. त्यासाठी मोठं भांडवल, परवाने आणि कडक अटी पूर्ण कराव्या लागतात. पण एकदा हा व्यवसाय सुरू झाला, की तो दीर्घकाळ स्थिर उत्पन्न देणारा ठरतो.
पेट्रोल पंप सुरू करण्याचा खर्च
ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान 20 लाख रुपये गुंतवणूक आवश्यक असते, तर शहरात ही गुंतवणूक 40 ते 50 लाख रुपये पर्यंत जाते. यात टाक्या, डिस्पेंसर, बांधकाम आणि इतर मूलभूत सुविधा यांचा खर्च समाविष्ट असतो. मोठ्या शहरांमध्ये ही गुंतवणूक 1 कोटी रुपयांहून अधिकही होऊ शकते. बँका पेट्रोल पंप उभारणीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतात.
1 लिटर पेट्रोलवर किती कमाई?
सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 94.77 रुपये प्रति लिटर आहे. या दरामधून पेट्रोल पंप मालकाला 4.39 रुपये प्रति लिटर एवढे कमिशन मिळते.
सरकारकडून हे कमिशन निश्चित केलेले असते. पंप मालकाला त्यावरून अधिक पैसे आकारता येत नाहीत.










