'तर माझा जीवच जाईल...', सेक्स टुरिझमचा हा नेमका प्रकार तरी काय?

मुंबई तक

What is sex tourism: इंडोनेशियामध्ये 'सेक्स टुरिझम' झपाट्याने वाढत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की मध्य-पूर्व देशातील अनेक पर्यटक इंडोनेशियातील गरीब मुलींशी लग्न करतात. पण हा नेमका प्रकार काय हे सविस्तरपणे जाणून घ्या.

ADVERTISEMENT

सेक्स टुरिझमचा हा नेमका प्रकार तरी काय?
सेक्स टुरिझमचा हा नेमका प्रकार तरी काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कंत्राटी लग्नाच्या माध्यमातून सुरू आहे देहविक्रीचा व्यवसाय

point

मध्य-पूर्व देशातील अनेक पर्यटकांना सेक्स टुरिझमची भुरळ

point

कंत्राटी लग्नाच्या माध्यमातून महिलांचं शोषण सुरू

Contract marriage and sex tourism: इंडोनेशिया: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील एका थ्री-स्टार हॉटेलमध्ये 17 वर्षीय वधू आणि 50 वर्षांच्या वराचा विवाह... कहाया (नाव बदलले आहे) काही लोकांच्या उपस्थितीत पार पडला. इस्लामिक कायद्यातील वादग्रस्त तरतुदीनुसार हा विवाह झाला असून कहायाचा नवरा सौदी अरेबियाचा पर्यटक होता. (sex tourism is spreading in a new way
what exactly is this type of sex tourism in which countries are contract marriages practiced)

लग्नानंतर कहायाची एक मोठी बहीण तिच्यासोबत गेली. ज्या एजंटने कहायाचे लग्न लावले तोही तिच्यासोबत पालक म्हणून आला होता.

सौदी अरेबियाच्या एका पर्यटकाने कहायाशी तात्पुरते लग्न करण्यासाठी हुंडा म्हणून  850 डॉलर (रु. 71,387) दिले. एजंट आणि मौलवीचा हिस्सा वजा केल्यावर कहायाच्या कुटुंबाला हुंड्याची फक्त अर्धी रक्कम मिळाली.

हे ही वाचा>> फक्त 3 टिप्स... तुमची पार्टनर बेडरुममध्ये होईल संतुष्ट, जाणून घ्या!

लग्नानंतर कहायाचा नवरा तिला जकार्तापासून दोन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कोटा बुंगा शहरातील एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेला. इथे कहायाबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याबरोबरच घरातील सर्व कामेही करून घेतली. कहाया जेव्हा मोकळी असायची तेव्हा साफसफाई, स्वयंपाक आणि टीव्ही पाहायची. कहाया तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत बेड शेअर करताना खूप अस्वस्थ होती आणि हे तात्पुरते लग्न लवकरात लवकर संपावे अशी तिची इच्छा होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp