वेश्याव्यवसाय म्हणजे अगदी ‘कूल प्रोफेशन’, स्टँडअप कॉमेडियनचं धक्कादायक विधान

ADVERTISEMENT

Standup comedian vidushi swaroop prostitution video goes viral on social media received backlash from users compared prostitution with engineering profession
Standup comedian vidushi swaroop prostitution video goes viral on social media received backlash from users compared prostitution with engineering profession
social share
google news

Vidushi swaroop: सध्याच्या जगात स्टँडअप कॉमेडीचा (Standup comedy) वेगळं फॅड आहे. मात्र स्टँड-अप कॉमेडियन म्हणून तुम्ही विनोद सादर करता त्यावेळी इतरांचाही तुम्हाला विचार करावा लागतो. कारण त्यामुळे तुमच्या विनोदामुळे कोणाच्याही धार्मिक भावना किंवा कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियाचे (Social Media) जगात अनेक गोष्टी सध्या व्हायरल (Viral Story) होत असतात. त्यामुळे या परिस्थितीत अनेक स्टँड अप कॉमेडियनला असं काहीतरी वेगळं करावं वाटत असतं. कारण त्याच्या जोरावरच त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळत असते. मात्र सध्या ज्याला कॉमेडी म्हणतात ते हे विसरतात की, आपल्या विनोदामुळे कोणीही दुखावू शकतो आणि कोणताही वाद उफाळून येऊ शकतो.

दर्जा घसरलेला विनोद

सध्या स्टँड-अप कॉमेडियन विदुषी स्वरूपबाबत जे घडत आहे त्याच्याकडे पाहिले की लक्षात विनोदाचा दर्जा तुमच्या लक्षात येतो. स्टँडअप कॉमेडियन विदुषी स्वरूपचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये विदुषी वेश्याव्यवसाय म्हणजे चांगलं आहे असं ती म्हणताना त्यामध्ये ती दिसते. कारण व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये विदुषीने वेश्याव्यवसायाची इतर व्यवसायाबरोबर तुलना केली आहे. त्यामुळे तिच्या त्या विनोदामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

लहान मुलीही वेश्याव्यवसायात

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विदुषी असं म्हणते की, मला वेश्याव्यवसाय चांगला आहे, आणि ते मी सिद्धही करु शकतो असंही तिनं म्हटले आहे. यामध्ये मी वेश्याव्यवसायाबाबत कोणताही भेदभाव करु शकत नाही असंही ती म्हणते. आपल्या देशातील अनेक लहान मुलींना वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याचा एनसीआरबीनेच अहवाल दिला आहे. असं म्हणत तिने मला मात्र त्याचा काही फरक पडत नाही असं म्हटले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> महिलेला विवस्त्र करून मारहाण : पत्नीवर गुन्हा दाखल होताच सुरेश धसांची मोठी मागणी

वेश्यांना मिळते दुबई ट्रीप

देशातील इतक्या गंभीर विषयावर विदुषी मात्र असंवेदनशीलपणे व्यक्त होताना दिसून येत आहे. ती त्यापुढंही जाऊन म्हणते की, वेश्याव्यवसाय हा एकमेव असा व्यवसाय आहे जो एखाद्या इंटर्न सीईओपेक्षाही अधिक कमाई करु शकतो. त्यामुळे ती किती या विषयावर असंवेदनशीलपणे व्यक्त होते तेच दिसून येतं. तर तिने त्यामध्ये तिनंही हेही म्हटले आहे काही वेश्यांना तर दुबई ट्रीपही मिळत असते.

तुलना कशासाठी?

विदुषी ज्या प्रकारे ती स्टँडअप कॉमेडी करते आहे ते पाहून तिला कधी कोणती वेश्या भेटली आहे की नाही असा सवाल उपस्थित होतो असं वाटतं. वेश्याव्यवसायाची अभियांत्रिकीसारख्या व्यवसायाबरोबर तुलना करुन त्या विदुषीने हेच दाखवून दिले आहे की, सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात काहीही सांगितलं तरी लोकं हसतात हेच तिनं खूप वाईट पद्धतीने सिद्ध केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘एकदा होऊनच जाऊ द्या…’, अजित पवारांची प्रचंड मोठी मागणी, भाजपलाच गाठलं खिंडीत?

कॉमेडी आणि व्हल्गारिटी

एकीकडे जगात स्टँडअप कॉमेडीचा आशय सुधारण्याची गोष्टी करत आहेत, तर दुसरीकडे भारतात मात्र विदुषीसारखी लोकं थिल्लर विनोद का करता असा सवालही निर्माण होतो आहे. विदुषी असो किंवा इतर कोणताही स्टँड अप कॉमेडियन असो त्यांना हे समजून घ्यायचे आहे की कॉमेडी आणि व्हल्गारिटी यामध्ये फरक आहे हे तिला दाखवून देणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT