Adenomyosis : गर्भाशयात अचानक होणाऱ्या वेदना असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Sudden pain in the uterus can be a sign of this Adenomyosis serious disease
Sudden pain in the uterus can be a sign of this Adenomyosis serious disease
social share
google news

Women Health Tips : अनेकदा महिलांमध्ये काही आजारांची लक्षणं आढळतात मात्र, त्याबद्दल त्यांना फार काही माहित नसतं. अशावेळी बऱ्याचदा त्या याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हे आजार प्राणघातक ठरू शकतात. अशाच एका आजाराच्या लक्षणांबद्दल निदान झालं आहे ज्याला एडेनोमायसिसचा (Adenomyosis) असं म्हणतात. (Sudden pain in the uterus can be a sign of this Adenomyosis serious disease)

ADVERTISEMENT

एडेनोमायसिस हा गर्भाशयाशी संबंधित आजार आहे. माहितीनुसार, पाचपैकी एखाद्या महिलेला हा आजार असण्याची शक्यता आहे. बऱ्याच लोकांनी याबद्दल कधी ऐकलंही नाही आहे.

वाचा : Maha Vikas Aghadi : रात्रीत फिरला डाव! एक कॉल अन् आंबेडकर झाले तयार

एडेनोमायोसिस म्हणजे काय?

एडेनोमायोसिसमध्ये, स्त्रियांना अनियमित किंवा जास्त रक्तस्त्राव होणारी मासिक पाळी येऊ शकते. इतकंच नाही, तर त्यामुळे ओटीपोटात प्रचंड वेदना होऊ शकतात. रुग्णांमध्ये लक्षणांची तीव्रता भिन्न असू शकते. तसंच एडेनोमायोसिस असलेल्या एक तृतीयांश स्त्रियांमध्ये कमी किंवा ही लक्षणं नसूही शकतात.

हे वाचलं का?

या आजारामुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. ॲडेनोमायोसिस असलेल्या स्त्रिया ज्या गर्भवती होतात त्यांना गर्भपात, अकाली प्रसूती, प्री-एक्लॅम्पसिया आणि प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

वाचा : Lok Sabha 2024 : ठाकरेंना झुकतं माप! ‘मविआ’चं जागावाटप अंतिम टप्प्यात

गर्भाशयात तयार होतात एंडोमेट्रियम पेशी

एडेनोमायोसिस हा गर्भाशयाला प्रभावित करणारा आजार आहे. यामध्ये, गर्भाशयाच्या स्नायूंच्या थरामध्ये एंडोमेट्रियम सारख्या पेशी तयार होतात, ज्याला मायोमेट्रियम म्हणतात. साधारणपणे अशा पेशी गर्भाशयाच्या बाहेर आढळतात, परंतु एडेनोमायोसिसमध्ये त्या गर्भाशयाच्या थरांवर आढळतात.

ADVERTISEMENT

एडेनोमायोसिसचे निदान ऐतिहासिकदृष्ट्या हिस्टरेक्टॉमी नंतर पॅथॉलॉजीच्या मूल्यांकनावर अवलंबून आहे. तसंच, एमआरआय आणि पेल्विक अल्ट्रासाऊंड सारख्या इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने, शस्त्रक्रिया न करताही त्याचे निदान केले जाऊ शकते. हे कठीण असते. अनेक वेळा यात कोणतीही लक्षणे आढळत नाहीत.

ADVERTISEMENT

वाचा : Padma Awards 2024 : महाराष्ट्रातील 12 जणांसह 132 जणांना पद्म, पहा संपूर्ण यादी!

एडेनोमायोसिसवर उपचार पद्धती कोणत्या?

एडेनोमायोसिसच्या उपचारांत, वेदना आणि जास्त रक्तस्त्राव कमी करण्यासाठी हार्मोनल आणि नॉन-हार्मोनल औषधे दिली जातात. क्लिनिकल उपचार प्रभावी नसल्यास, हिस्टेरेक्टॉमीसह शस्त्रक्रिया पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. तसंच, उपचार कसे करावे आणि करून घ्यावे हे देखील रुग्णाला काय सोयीस्कर आहे यावर अवलंबून असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT