ट्रेनला प्रचंड गर्दी अन् मिळत नाही तिकीट? ‘या’ सोप्या पद्धतीने IRCTC वर करता येईल तत्काळ बुकिंग!
भारतात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. यंदा दिवाळी आणि त्यानंतर छठ पूजेचा सण काही दिवसांनी येत आहे. या सणासुदीच्या काळात ट्रेनसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामुळेच IRCTC वर तत्काळ तिकीट कन्फर्म करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

IRCTC Ticket Booking : भारतात कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. यंदा दिवाळी आणि त्यानंतर छठ पूजेचा सण काही दिवसांनी येत आहे. या सणासुदीच्या काळात अनेक लोक आपआपल्या घरी जातात. या काळात ट्रेनसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यामुळेच आज आपण अशा काही खास टिप्स जाणून घेऊयात ज्यांच्या मदतीने यूजर्स IRCTC वर तत्काळ तिकीट कन्फर्म करू शकतात. (Train is very crowded and you don’t get a ticket for Instant booking on IRCTC try this easy way)
IRCTC वर सीट बुकिंग इतक्या वेगाने होते की, बरेच लोक मागे राहून जातात. आज याच एका खास ट्रिकबद्दल समजून घेऊयात, ज्यानंतर तत्काळ तिकीट बुक करणे खूप सोपे होईल.
वाचा : Gram Panchayat Election Result 2023 : दिलीप वळसे पाटलांच्या गडाला सुरूंग
बुकिंग सुरू होताच प्रक्रिया मंदावते?
सामान्यत: लोकांची तक्रार असते की, जेव्हा ते IRCTC वर तत्काळ तिकीट बुक करतात तेव्हा वेबसाइटचा वेग कमी होतो किंवा अशा परिस्थितीत अनेकांचे इंटरनेट स्लो होते. अशा वेळी, यूजर्स प्रवाशांचे तपशील भरत असताना, अनेक जागा भरल्या जातात.
‘या’ ऑनलाइन टूल्समुळे तिकीट बुकिंग होईल सोपे
IRCTC वर तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी, तुम्ही IRCTC तत्काळ ऑटोमेशन टूल वापरणे आवश्यक आहे. हे तुम्हाला प्रवाशांचे तपशील भरण्यास मदत करेल आणि तुम्ही त्वरीत तिकीट बुक करू शकता.










