What is Hamas : माणसांच्या कत्तली… इस्रायलला संपवण्यासाठी जन्म; काय आहे हमास?
हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा इस्रायलवर हल्ला चढवला. त्यामुळे हमास कोण आणि तिची स्थापन कधी, कशासाठी झाली, याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

Hamas History : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलवर आतापर्यंतचा सर्वात भयावह आणि भंयकर हल्ला केला. हमासच्या सैनिकांनी जमिनीवरून आणि हवेतून अशा तिन्ही ठिकाणांहून इस्रायलला लक्ष्य केले. यात 300 हून अधिक लोक मारले गेले. शेकडो जखमी झाले आणि असंख्य लोकांना ओलिस ठेवले आहे.
शनिवारी (7 ऑक्टोबर) इस्रायलमधून आलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारी आहेत. हमासचे दहशतवादी सामान्य लोकांवर अत्याचार करत आहेत. हमासकडून सुरू असलेल्या क्रूर कृत्ये थरकाप उडवत आहेत. याच संघटनेने अभेद्य समजल्या जाणाऱ्या इस्रायलची सुरक्षा व्यवस्था नष्ट केली. त्यामुळेच हमास कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हमास ही पॅलेस्टिनी इस्लामिक दहशतवादी संघटना आहे, जिचा गाझा पट्टीवर कब्जा आहे. हमासने इस्रायलचा सत्यानाश करण्याची शपथ घेतली आहे आणि 2007 मध्ये गाझामध्ये सत्ता घेतल्यापासून इस्रायलशी अनेक युद्धे केली आहेत. त्या युद्धांदरम्यान हमासने इस्रायलवर हजारो रॉकेट डागलेत आणि इतर प्राणघातक हल्ले केलेत. इस्रायलनेही हमासवर वारंवार हवाई हल्ले केले आहेत आणि इजिप्तसोबत मिळून गाझा पट्टीवर 2007 पासून सुरक्षेसाठी नाकेबंदी केली आहे.
पॅलेस्टिनी गट हमास काय आहे?
1) हमास किंवा इस्लामिक संघटनेची स्थापना 1987 मध्ये पहिल्या पॅलेस्टिनी इंतिफादादरम्यान झाली. इंतिफादा, ज्याचा अर्थ बंड किंवा विद्रोह करणे आहे. याला इराणचा पाठिंबा आहे आणि त्यांची विचारधारा 1920 च्या दशकात इजिप्तमध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामिक विचारसरणीसारखी आहे.