Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? 'ही' माहिती वाचाच
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेच्या अर्जाची मुदतवाढ 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतलाय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत दिली महत्त्वाची माहिती
'या' महिलांच्या खात्यात जमा होतील लाडकी बहीण योजनेचे पैसे
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने या योजनेच्या अर्जाची मुदतवाढ 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतलाय. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे. परंतु, या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना सप्टेंबरच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा लागली आहे. हे पैसे नेमके कोणत्या तारखेला मिळतील, असा प्रश्न महिलांना पडला आहे. याविषयी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आदिती तटकरे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज भरले होते, त्या महिलांना सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळतील. ज्यांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आबे, त्यांचेही पैसै लवकरच खात्यात जमा केले जातील. या योजनेच्या अर्जाची छाननी सुरु असल्यातं आदित तटकरे यांनी सांगितलं.
हे ही वाचा >> Abhishek vs Aishwarya: अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायचा घटस्फोट होणार? खळबळजनक Video आला समोर
माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 40 लाखांहून अधिक अर्ज जमा झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत अर्जाची छाननी आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेच्या माध्यमातून दोन कोटींहून अधिक महिला पात्र होतील, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तटकरे पुढे म्हणाल्या, अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना विस्तारली जाईल, असा अंदाज आमच्या विक्षागाडकून वर्तवण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळण्याचं आमचं उद्दीष्ट आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत,त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ लवकरच दिला जाईल, असंही अदिती तटकरे म्हणाल्या.
हे ही वाचा >> Pune News: पुण्यात कामाच्या ताणामुळे CA तरुणीचा मृत्यू! संतापलेल्या आईचं पत्र व्हायरल
महिलांच्या सुरक्षेबाबतही आदिती तटकरे यांनी मोठं विधान केलं. राज्यातील महिला सुरक्षीत राहाव्यात, हे सर्वांचं उद्दीष्ट आहे. यामध्ये राजकाणर आणण्याचं कोणतही कारण नाही. योजना आणि महिलांना सुरभा देणं हे वेगवेगळे भाग आहेत. राज्य सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याच्या अनेक बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT