Geetika Shrivastava : पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तपदी पहिल्यांदाच महिला, कोण आहेत श्रीवास्तव?
भारताने प्रथमच पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयाची कमान एका महिला IFS अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. 2005 बॅचच्या IFS अधिकारी गीतिका श्रीवास्तव या पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेअर्स (CDA) असतील.
ADVERTISEMENT
Who is Geetika Srivastava : भारताने प्रथमच पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयाची कमान एका महिला IFS अधिकाऱ्याकडे सोपवली आहे. 2005 बॅचच्या IFS अधिकारी गीतिका श्रीवास्तव या पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या चार्ज डी अफेअर्स (CDA) असतील. त्या एम सुरेश कुमार यांची जागा घेतील, जे आतापर्यंत हे पद भूषवत आहेत. सुरेश कुमार दिल्लीत परत येऊ शकतात. (Who is Geetika Srivastava in charge of Indian High Commission in Pakistan)
ADVERTISEMENT
भारत आणि पाकिस्तानमध्ये मर्यादित राजनैतिक संबंध आहेत. सध्या दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयात उच्चायुक्त नाहीत. 2019 मध्ये अजय बिसारिया हे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाचे प्रमुख होते. हे उच्चायुक्तांचे सर्वोच्च पद आहे. पण 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि 35A रद्द केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्ताचा दर्जा कमी करण्याचा निर्णय घेतला आणि अजय बिसारिया भारतात परतले.
PM पदासाठी आघाडीचा संभ्रम… INDIA बैठकीत ‘या’ 8 महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा!
यानंतर सुरेश कुमार यांच्याकडे इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाचा सीडीए म्हणून कार्यभार होता. केंद्र सरकारमध्ये सहसचिव पदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सीडीएचे पद दिले जाते. गीतिका श्रीवास्तव आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव होत्या.
हे वाचलं का?
गीतिका श्रीवास्तव आहेत तरी कोण?
IFS अधिकारी गीतिका सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इंडो-पॅसिफिक विभागाच्या प्रभारी आहेत. हा विभाग दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN), इंडियन ओशन रिम असोसिएशन (IORA), फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलंड्स कोऑपरेशन (FIPIC) आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील इतर संस्थांची देखरेख करतो. याआधी त्या हिंद महासागर विभागाच्या संचालक होत्या. गीतिका 2007 ते 2009 दरम्यान चीनमधील भारतीय दूतावासात कार्यरत होत्या. याशिवाय त्यांनी कोलकात्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्येही काम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परदेशी भाषा शिकण्यासाठी गीतिका यांनी प्रशिक्षणादरम्यान मँडरिन ही चीनी भाषा शिकली होती. त्यावेळी त्या चीनमध्ये काम करत होत्या.
India alliance meeting Mumbai : “मोदींवर तुटून पडण्यासाठी श्वापदांची टोळी”
आतापर्यंत केवळ पुरुषांनीच सांभाळलं ‘हे’ पद!
माहितीनुसार, 1947 पासून पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाचे नेतृत्व 22 पुरुष अधिकाऱ्यांनीच केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजनैतिक संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींच्या सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाची कमान एका महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, यापूर्वीही पाकिस्तानमध्ये भारताच्या बाजूने महिला मुत्सद्दी नेमण्यात आल्या आहेत. पण त्यांना मिशनची सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली नाही.
ADVERTISEMENT
India vs Pakistan : भारत-पाकिस्तान भिडणार, ‘हे’ 3 मोठे विक्रम मोडणार!
इकडे पाकिस्तानने आपला नवीन सीडीए दिल्लीलाही पाठवला आहे. आतापर्यंत सलमान शरीफ दिल्लीत पाकिस्तानच्या बाजूने सीडीएचे पद सांभाळत होते. ते इस्लामाबादला परतले आहेत. आता त्यांची जागा साद अहमद वाराइच यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT
सीडीए हे निम्न-स्तरीय राजनयिक संबंध राखतात. दोन देशांमधील राजकीय तणावाच्या बाबतीत सीडीएची नियुक्ती केली जाते. राजदूताच्या अनुपस्थितीत, उच्चायुक्तालयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT