Satara: 'ब्लेम गेम कशाला खेळता?', उदयनराजे भडकले.. मोदींसमोरच संविधानवरून विरोधकांना भिडले!
Udayanraje Bhosale: संविधानाच्या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024: कराड: लोकसभा निवडणूक 2024 साठी (Lok Sabha Election 2024) पंतप्रधान मोदी यांनी आज सातारा मतदारसंघातील कराडमध्ये जाहीर सभा घेतली. याच सभेत भाजपचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी जोरदार भाषण केलं. तसंच संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर थेट निशाणा साधला. (why do you play the blame game udayanraje bhosle flared up in front of prime minister modi he confronted the opposition on the constitution)
ADVERTISEMENT
'ज्यावेळेस संविधानाच्या बाबतीत बोललं जातं. ज्यावेळेस कुठलं ही नियोजन नसतं.. विकासकामाबद्दल बोलता येत नाही.. त्यावेळी काय चालू होतं की, तर ब्लेम गेम.. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवायचं की, हे संविधान बदलणार आहेत.' अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला
पाहा उदयनराजे नेमकं काय म्हटलंय
'मोदीजी पुन्हा सत्तेत येणार आणि मोदीजींच्या नेतृत्वात भारताची अधिक प्रगती होईल. सातारा मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजपर्यंत आपण काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलं. त्यांनी फक्त सत्तेत येण्याकरिता आपल्यापुढे मताचा जोगवा मागितला. पण पिण्याचा पाण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतो.. त्यासंदर्भात काय केलं? तर काही केलं नाही.. किंबहुना एवढा अंहकार माजला होता. पर्याय नव्हता.. त्यांना कळालेलं.. यांचं काम जरी केलं नाही तरी कुठे जाणार? ते आपल्या मागे येणार.. नाही तर गप घरी बसणार.. एवढा मोठा अंहकार.. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं.'
हे वाचलं का?
हे ही वाचा>> जॉब सोडला.. शेवटच्या दिवशी ऑफिससमोर ढोल लावून नाच नाच नाचला...
'या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा भाजपने त्यावेळेस कृष्णा खोरेसारखा प्रकल्प त्यावेळी हाती घेतलेला. 1996 साली मुंडे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी मी त्यांची भेट घेऊन सांगितलं होतं की, अशी परिस्थिती आहे. त्यांनी क्षणभर विचार न करता म्हणाले की, हे रास्त आहे. त्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. हेच जर काँग्रेसचं सरकार तर त्यांनी विचार का केला नाही?'
'मुंडेसाहेब म्हणू शकले असते आपला त्या भागात आमदार नाही, खासदार नाही. मग कशाला निधी द्यायचा. हे भाजपचे विचार नाहीत. भाजपचे जे विचार आहेत विकासाचे, कल्याणाचे विचार त्यामुळे आज या पक्षाची संपूर्ण जगभरात वाहवा होते आहे.'
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Narendra Modi : ''काँग्रेसने 40 वर्ष सैनिकांच्या कुटुंबियांना...'',
'एक आवर्जून सांगावासं वाटतं... ज्यावेळेस संविधानाच्या बाबतीत बोललं जातं. ज्यावेळेस कुठलं ही नियोजन नसतं.. विकासकामाबद्दल बोलता येत नाही.. त्यावेळी काय चालू होतं की, तर ब्लेम गेम.. म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवायचं की, हे संविधान बदलणार आहेत. कशाला बदलणार आहेत संविधान? काय गरज आहे संविधान बदलण्याची.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी जी संविधान बनविण्यारे तज्ज्ञ लोकं होतं. अत्यंत उत्कृष्ट असं संविधान तयार केलं आहे.'
ADVERTISEMENT
'ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचा जो विचार केला त्या समतेच्या भावनेतून हे संविधान तयार करण्यात आलं आहे. संविधान बदलणार.. संविधान बदलणार.. पण अहो संविधानाचा खात्मा.. म्हणजे खल्लास करण्याचं काम काँग्रेसच्या त्यावेळच्या पंतप्रधान असणार्या इंदिराजींनी आणबाणी लागू केली.' असं उदयनराजे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT