गुड न्यूज! प्रत्येक महिन्याला मिळणार लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, 'हे' काम लगेच करा

मुंबई तक

ADVERTISEMENT

माझी लडाकी बहिन योजना
माझी लडाकी बहिन योजना
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जाणून घ्या लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वाची अपडेट

point

'हे' काम तातडीनं पूर्ण केलं, तर झटपट मिळतील 1500 रुपये

point

...तर या महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे

Mazi Ladaki Bahin Yojana Latest Update: महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 17 ऑगस्ट 2024 रोजी झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना विकसीत करून त्यांना साक्षर करण्याच्या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

कुणाला मिळणार या योजनेचा लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. लाभार्थ्याचं वय २१ ते ६५ वर्षांच्या आत असलं पाहिजे. विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत आणि बेवारस महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराकडे बँक खातं असलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असू नये.

या कागदपत्रांची आवश्यकता

1) आधारकार्ड
2) निवडणूक ओळखपत्र
3) बँक खातं
4) जातीचा दाखला
5) रहिवासी दाखला
6) उत्पन्नाचा दाखला
7) रेशन कार्ड
8) पासपोर्ट साईज फोटो
9) पिवळ्या आणि नारंगी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही.
10) जन्मदाखला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : " मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी...", मविआच्या आंदोलनात उद्धव ठाकरे कडाडले

कुणाला मिळणार नाही या योजनेचा लाभ?

1) ज्या महिलांच्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे
2) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात.
3) ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/बोर्ड/भारत किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल.
4) ज्या महिलांना सरकारच्या अन्य विभागाच्या एखाद्या योजनेद्वारे 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा लाभ मिळत असेल.
5) ज्या महिलांकडे ट्रॅक्टर वगळता अन्य चारचाकी गाड्या आहेत.


योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा कराल?

ज्या महिला ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. त्यांनी अंगनवाडी वर्कर, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, आशा वर्कर किंवा वॉर्ड अधिकारीशी संपर्क करू शकतात. हे अर्ज करण्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जात नाही. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक आणि पत्ता आधारकार्डनुसार अचूकपणे भरला पाहिजे. बँकेचे डिटेल्स आणि मोबाईलनंबरही अधिकृत असला पाहिजे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sanjay Raut : ''...तर तुमचा कडेलोट केला असता'', संजय राऊतांनी महायुतीवर डागली तोफ


ऑनलाईन अर्ज कसा करणार?

सरकारने या योजनेच्या नोंदणीसाठी मोबाईल अॅप सुरु केलं आहे. या अॅपला 'नारी शक्ती दूत' अॅप असं नाव देण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून कोणताही लाभार्थी माझी लाडकी बहीण योजनेत नावाची नोंदणी करु शकतो. हे अॅप एन्ड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या मोबाईलसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या मोबाईलवरून नोंदणी करु शकता.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT