नव्या संसदेचे शिल्पकार! कोण आहेत बिमल पटेल? - Mumbai Tak - who is bimal patel the architect of new parliament - MumbaiTAK
नॉलेज बातम्या

नव्या संसदेचे शिल्पकार! कोण आहेत बिमल पटेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देत नवीन संसद भवनात प्रवेशाची घोषणा केली. संसदेची नवीन इमारत तयार आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांनी त्याचे उद्घाटन केले.

New Parliament Architect :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या आठवणींना उजाळा देत नवीन संसद भवनात प्रवेशाची घोषणा केली. संसदेची नवीन इमारत तयार आहे. 28 मे रोजी पंतप्रधानांनी त्याचे उद्घाटन केले. लोकसभा सचिवालयाच्या म्हणण्यानुसार नवीन संसद भवन विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान मोदींनी त्याची पायाभरणी केली होती. (Who is Bimal Patel the Architect of New Parliament)

नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रकल्पाने केले असून या इमारतीचे डिझाइन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसिद्ध इमारतींचे डिझाईन केले आहे. बिमल पटेल यांच्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

नव्या संसदेचा आजपासून श्रीगणेशा, जाणून घ्या ‘या’ भवनाची 5 वैशिष्ट्ये

बिमल पटेल कोण आहेत?

बिमल पटेल यांचा जन्म 31 ऑगस्ट 1961 रोजी गुजरातमध्ये झाला. ते सुमारे 35 वर्षांपासून आर्किटेक्चर, शहरी रचना आणि शहरी नियोजनाशी संबंधित काम करत आहेत.

याशिवाय बिमल पटेल हे अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठाचे अध्यक्षही आहेत. ते आर्किटेक्चर, प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट फर्म एचसीपी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे ​​नेतृत्व करतात.

2019 मध्ये, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंगमध्ये त्यांच्या अपवादात्मक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बिमल पटेल यांचे शिक्षण किती?

बिमल पटेल यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी येथे त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केला.

Otzi the Iceman : 5000 वर्ष जुन्या ममीचा इतिहास, एक्स-रे मधून समजलं तरी काय?

1984 मध्ये CEPT मधून आर्किटेक्चरमध्ये पहिली व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी पीएचडी पदवी मिळवली.

करिअरची सुरूवात कशी झाली?

बिमल पटेल यांनी 1990 मध्ये वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम अहमदाबादमधील उद्योजकता विकास संस्थेची रचना केली. यासाठी त्यांना 1992 मध्ये आर्किटेक्चरसाठी आगा खान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यानंतर त्यांनी घरे, संस्था, औद्योगिक इमारती आणि नागरी पुनर्विकास प्रकल्पांवर काम केले. कांकरिया लेक डेव्हलपमेंट आणि साबरमती रिव्हरफ्रंट सारखे शहरी डिझाइन प्रकल्प हे देशातील पहिले प्रकल्प आहेत.

त्यांच्या कार्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1992 मध्ये आर्किटेक्चरसाठी आगा खान पुरस्कार, 1998 मध्ये युनायटेड नेशन्स अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, 2001 मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अवॉर्ड आणि 2006 मध्ये पीएम नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईनने त्यांना सन्मानित करण्यात आले.

Hardeep Singh Nijjar : कॅनडाच्या उद्धटपणाला भारताचे जशास तसे उत्तर, मोदी सरकारचा दणका

बिमल पटेल यांनी कोण-कोणते प्रोजेक्ट्स केले आक्रिटेक्ट?

  • संसद भवन आणि सेंट्रल व्हिस्टा, नवी दिल्ली
  • विश्वनाथ धाम, काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी
  • मंत्री ब्लॉक आणि सचिवालय, गुजरात
  • आगा खान अकादमी, हैदराबाद
  • पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठ, गुजरात
  • साबरमती रिव्हरफ्रंट विकास प्रकल्प
  • टाटा सीजीपीएल टाऊनशिप, मुंद्रा, गुजरात
  • आयआयएम अहमदाबादचे नवीन कॅम्पस, अहमदाबाद
  • सीजी रोड, अहमदाबादचा पुनर्विकास
  • गुजरात हायकोर्ट बिल्डिंग, अहमदाबाद
  • उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद

नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये कोणती?

  • त्रिकोणी आकारात बांधलेले नवी संसद भवन चार मजली आहे. हा संपूर्ण परिसर 64,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. त्याची किंमत 862 कोटी रुपये आहे.
  • नवीन इमारतीमध्ये संविधान सभागृह देखील असेल, ज्यामध्ये भारतीय लोकशाहीचा वारसा प्रदर्शित केला जाईल.
  • याशिवाय या संसदेत एक विश्रामगृह, अनेक समिती कक्ष, खासदारांसाठी जेवणाचे क्षेत्र आणि पार्किंगची जागा असेल.
  • ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार असे संसद भवनाचे तीन मुख्य दरवाजे आहेत. तर व्हीआयपी, खासदार आणि पाहुण्यांचा प्रवेश वेगळ्या गेटमधून होईल.
  • नवीन संसद भवनात लोकसभेच्या 888 आणि राज्यसभेच्या 300 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाली, तर त्यात एकावेळी 1,280 खासदार बसू शकतील.
Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!