लाइव्ह

IPL Auction 2024 Live : पॅट कमिन्सला टाकलं मागे, ‘हा’ खेळाडू ठरला IPL मधला सर्वात महागडा खेळाडू

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl auction 2024 live updates in dubai venue 333 players in auction indian premier league season 17
ipl auction 2024 live updates in dubai venue 333 players in auction indian premier league season 17
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:24 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : हे युवा खेळाडू राहिले अनसोल्ड

    कमलेश नागरकोटी, प्रदोष पॉल, अजितेश, गौरव चौधरी, बिपिन सौरभ, के.एम. आसिफ,शाकिब हुसेन, मोहम्मद कैफ,अभिलाष शेट्टी, गुरजपनीत सिंग, रोहित रायडू,पृथ्वी राज यारा आणि शुभम अग्रवाल हे खेळाडू अनसोल्ड राहिले.
  • 08:19 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : प्रिन्स चौधरी पंजाब किंग्जच्या ताफ्यात

    पंजाब किंग्ज संघाने प्रिन्स चौधरीला संघात सामील केले आहे. पंजाबने प्रिन्सला 20 लाखाच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.
  • 08:10 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : रिचर्डसन-रहमानला कोणत्या संघाने केले खरेदी?

    दिल्ली कॅपिटल्सने झाय रिचर्डसनला 5 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. तर मुस्तफिजुर रहमान 2 कोटींच्या मूळ किमतीत CSK चा भाग बनला आहे.
  • 06:38 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : कुमार कुशाग्र दिल्लीच्या ताफ्यात

    कुमार कुशाग्र यांनाही चांगली रक्कम मिळाली आहे. यष्टिरक्षक फलंदाज कुशाग्राला दिल्ली कॅपिटल्सने 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. कुशाग्रची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.
  • ADVERTISEMENT

  • 06:38 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : यश दयाल आरसीबी संघातून आयपीएल खेळणार

    यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतले आहे. यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात यशच्या चेंडूवर पाच षटकार ठोकले होते.
  • 05:56 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : शाहरुख खान गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

    शाहरुख खानला गुजरात टायटन्सने ७.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुखची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. दुसरीकडे, रमणदीप सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
  • ADVERTISEMENT

  • 03:59 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात

    जयदेव उनाडकटला सनरायझर्स हैदराबादने 1.60 कोटी रुपयांना विकत घेतले. तर जोश हेझलवूड अनसोल्ड राहिला आहे.
  • 03:51 PM • 19 Dec 2023

    Mitchell Starc: : मिचेल स्टार्क IPL मधला सर्वात महागडा खेळाडू

    मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने स्टार्कला विकत घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण शेवटी लिलावात केकेआरने विजय मिळवला आहे.
  • 03:37 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : शिवम मावी लखनऊकडून आयपीएल खेळणार

    शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्सने 6.40 कोटी रुपयांना विकत घेतले. मावीची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
  • 03:35 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : उमेश यादव गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

    वेगवान गोलंदाज उमेश यादवला गुजरात टायटन्सने 5.8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. उमेश यादवची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • 03:32 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : लॉकी फर्ग्युसन राहिला अनसोल्ड, चेतन केकेआरकडून खेळणार

    लॉकी फर्ग्युसन अनसोल्ड राहिला आहे. फर्ग्युसनची बेस प्राईज 2 कोटी रुपये होती. चेतन साकारियाला कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.
  • 03:27 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : अल्झारी जोसेफ आरसीबीकडून खेळणार

    आरसीबीने अल्झारी जोसेफला 11.50 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अल्झारीची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
  • 03:24 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : के.एस. भरत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

    के.एस. भरतने कोलकाता नाईट रायडर्सला 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे भरत कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानात खेळणार आहे.
  • 03:21 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : ट्रिस्टन स्टब्स दिल्लीच्या ताफ्यात

    ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात सामील केले आहे.
  • 03:19 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : इंग्लंडचा स्टार क्रिकेटर फिल सॉल्ट राहिला अनसोल्ड

    आयपीएल लिलावाच्या तिसऱ्या फेरीत फिल सॉल्टने अनसोल्ड राहिला आहे. फिल सॉल्टची बेस प्राईज दीड कोटी रुपये होती.
  • 03:15 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आयपीएल संघाच्या पाकिटात किती पैसे उरले?

    आरसीबी- 23.25 कोटी केकेआर - 32.70 कोटी पंजाब किंग्स- 13.15 कोटी सीएसके- 11.60 कोटी दिल्ली कॅपिटल्स- 24.95 कोटी राजस्थान रॉयल्स- 7.10 कोटी मुंबई इंडियंस- 12.75 कोटी हैदराबाद - 5.20 कोटी सुपर जायंट्स- 13.15 कोटी टायटन्स- 37.65 कोटी
  • 03:01 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 खेळाडूंचा लिलाव

    1. रोव्हमन पॉवेल (वेस्टइंडीज) : 7.40 कोटी, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 कोटी) 2. हॅरी ब्रूक (इंग्लंड)- 4 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 2 कोटी) 3. ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी) 4. वानिंदु हसारंगा (श्रीलंका)- 1.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1.5 कोटी) 5. रचिन रवींद्र (न्यूजीलंड)- 1.80 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख) 6. शार्दुल ठाकुर (भारत)- 4 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी) 7. अजमतुल्लाह उमरजई (अफगानिस्तान)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख) 8. पॅट कमिंस (ऑस्ट्रेलिया)- 20.50 कोटी, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 कोटी) 9. जेराल्ड कोएत्जी (साउथ अफ्रीका)- 5 कोटी, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 कोटी) 10. हर्षल पेटल (भारत)- 11.75 कोटी, पंजाब किंग्स ((बेस प्राइस- 2 कोटी) 11. डेरिल मिचेल (न्यूजीलंड)- 14 कोटी, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 1 कोटी) 12. क्रिस वोक्स (इंग्लंड)- 4.20 कोटी़, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 कोटी)
  • 02:55 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : इंग्लंडच्या ख्रिस वोक्सला पंजाबने घेतले विकत

    इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जने 4.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. वोक्सची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • 02:49 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने घेतलं ताफ्यात, किती बोली लागली?

    डेरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतले आहे. मिशेलने क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दोन शतके झळकावली होती.
  • 02:40 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : जेराल्ड कोएत्झी मुंबईकडून खेळणार

    साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर जेराल्ड कोएत्झी मुंबईकडून खेळणार आहे. जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सने 5 कोटींना विकत घेतले आहे. कोएत्झीची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • 02:36 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : हर्षद पटेल बनला किंग, पंजाब संघाकडून खेळणार

    हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हर्षल पटेलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • 02:33 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : अजमतुल्ला उमरझाई गुजरातच्या ताफ्यात

    अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. अजमतुल्ला उमरझाई अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.
  • 02:27 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आस्ट्रेलियाचा हा खेळाडू ठरला सर्वात महागडा, किती कोटीची बोली लागली?

    ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातसा सर्वांत महागडा खेळाडू ठरलाय. पॅट कमिन्स याची बेस प्राईज 2 कोटी होती. हैदराबाद, चेन्नई, बंगलोर यांच्यात त्याला घेण्यासाठी चुरस रंगली होती. अखेर हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं आहे.
  • 02:19 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : अजमतुल्ला उमरझाई गुजरातच्या ताफ्यात

    अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. अजमतुल्ला उमरझाई अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.
  • 02:17 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : लॉर्ड शार्दुल ठाकूर चेन्नई संघाकडून खेळणार

    शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटींना विकत घेतले आहे. शार्दुलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्यामुळे शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार आहे.
  • 02:11 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : वर्ल्डकपमध्ये धावांचा पाऊस पाडणारा रचिन रवींद्र कोणत्या संघात?

    रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सने 1.80 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. रवींद्रची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्यामुळे आयपीएलमध्ये रचिन रवींद्र चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे.
  • 02:02 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : वानिंदू हसरंगा सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात

    आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या फेरीला सुरूवात झाली आहे. यामध्ये वानिंदू हसरंगाला सनरायझर्स हैदराबादने दीड कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हसरंगाची मूळ किंमत केवळ दीड कोटी रुपये होती.
  • 01:57 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : पहिला राऊंडमध्ये हे मॅचविनर खेेळाडू अनसोल्ड

    आयपीएल लिलावाची पहिली फेरी संपली आहे. यामध्ये टीम इंडियाच्या करूण नायर नंतर आता ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ देखील अनसोल्ड राहिला आहे. स्टीव्ह स्मिथ पाठोपाठ मनीष पांडे देखील अनसोल्ड राहिला आहे.
  • 01:46 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : तिहेरी शतक झळकावणारा टीम इंडियाचा हा खेळाडू अनसोल्ड

    कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा टीम इंडियाचा क्रिकेटर करुण नायर पहिल्या फेरीत विकला गेला नाही. नायरची मूळ किंमत 50 लाख रुपये आहे.
  • 01:40 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : हॅरी ब्रूकला 4 कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्सने केले खरेदी

    हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ब्रूक गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. ब्रुकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
  • 01:35 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : रिले रोसोला संघांची नापसंती, आयपीएल 2024 मध्ये राहिला अनसोल्ड

    रिले रोसोला कोणत्या संघाने खरेदी केली नाही. रोसोची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये तो अनसोल्ड राहिला आहे.
  • 01:29 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : रोव्हमन पॉवेल राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात, किती कोटींना केले खरेदी?

    रोव्हमन पॉवेलला विकत घेण्यासाठी नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेर राजस्थान रॉयल्सने पॉवेलला 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले. पॉवेल आता राजस्थानकडून खेळणार आहे.
  • 01:22 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आयपीएल ऑक्शनला सुरूवात

    आयपीएल ऑक्शन 2024 ला सुरूवात झाली आहे.
  • 12:53 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024: आयपीएल लिलावाआधी कोणाकडे किती रक्कम शिल्लक आहे?

    आयपीएलच्या लिलावात सर्व 10 संघांकडे एकूण 262.95 कोटी रुपये आहेत आणि या पर्समधून जास्तीत जास्त 77 खेळाडू खरेदी करता येतील. गुजरातमध्ये सर्वाधिक 38.15 कोटी रुपये आणि लखनऊमध्ये सर्वात कमी 13.15 कोटी रुपये आहेत.
  • 12:38 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आयपीएल लिलाव कुठे पाहता येणार?

    आयपीएल लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल. त्याच वेळी, जिओ सिनेमा अ‍ॅपवर मोबाइलवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. तसेच मुंबई तक वरही तुम्ही लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
  • 12:37 PM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : आयपीएलमध्ये प्रथमच लिलाव साकारणार भारतीय महिला

    आयपीएच्या इतिहासात प्रथमच एक महिला लिलाव साकारणार आहे. या महिलेचे नाव मल्लिका सागर आहे. बीसीसीआयने मल्लिका सागरची इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या खेळाडूंच्या लिलावासाठी लिलावकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी बीसीसीआय आयपीएल लिलावासाठी चारू शर्मा, रिचर्ड मॅडले किंवा ह्यू अ‍ॅडम्स हे लिलावकर्त्याची भूमिका बजावत होते.
  • 11:58 AM • 19 Dec 2023

    IPL Auction 2024 Live Update : 333 खेळाडूंचा होणार लिलाव

    यंदाच्या लिलावात एकूण 333 खेळाडूंवर बोली लागणार आहे. तर आयपीएल संघांकडे फक्त 77 स्लॉट उपलब्ध आहेत. त्यापैकी 30 विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आणि 119 विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 116 आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या 215 आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT