Madhavi Latha : ओवेसींविरोधात भाजपने शोधला नवा चेहरा, कोण आहेत डॉ. लता?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात भाजपने उमेदवारी दिलेल्या माधवी लता कोण आहेत?
who is madhavi latha?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

असदुद्दीन ओवेसींविरोधात भाजपचा नवा चेहरा

point

कोण आहे डॉ. माधवी लता?

point

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून लढवणार निवडणूक

Who is Madhavi Latha : भाजपने १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली. यात एक उमेदवार आहेत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघातील. भाजपने ज्यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे, त्या माधवी लता यांची प्रचंड चर्चा सुरूये... जाणून घ्या कोण आहेत लता?

ADVERTISEMENT

यावेळी तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघातील लढत रंजक असणार आहे. सध्या या जागेवरून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. यावेळी भाजपने ओवेसी यांच्याविरोधात डॉ.माधवी लता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. एका बाजूला ओवेसी असतील तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या माधवी लता.

हेही वाचा >> गडकरींऐवजी दुसरा उमेदवार? निरीक्षकांच्या प्रश्नाने चर्चांना उधाण

हैदराबादची जागा एआयएमआयएमचा बालेकिल्ला मानली जाते. ही जागा 1984 पासून AIMIM कडे आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन 1984 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते. त्यांनी 20 वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हापासून असदुद्दीन ओवेसी हैदराबादचे खासदार आहेत.

हे वाचलं का?

कोण आहेत माधवी लता?

ओवेसींच्या विरोधात भाजपला नवा चेहरा मिळाला आहे. ओवेसींना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देणे सोपे नाही, पण माधवी लता त्यासाठी तयारी करताना दिसत आहेत. ज्याप्रमाणे ओवेसींचे हॉस्पिटल हैदराबादमध्ये चालते, जिथे अतिशय कमी खर्चात चांगले उपचार मिळतात, त्याचप्रमाणे माधवी लता यांचे विरिंची नावाचे हॉस्पिटल आहे. त्या या रुग्णालयाच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय माधवी लता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा चर्चेत राहिली आहे.

माधवी आहेत भरतनाट्यम नृत्यांगना 

याशिवाय माधवी लता या भरतनाट्यम नृत्यांगनाही आहेत. हैदराबादमध्ये सामाजिक कार्यातही त्या खूप सक्रिय आहे. माधवी लता या ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करतात.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पहिल्या यादीने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचं वाढवलं टेन्शन, कारण...

त्या लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्याही अध्यक्षा आहेत. माधवी लता यांनी निराधार मुस्लिम महिलांसाठी एक छोटासा निधीही तयार केला असून, त्या अनेक सांस्कृतिक संस्थांशी निगडीत आहेत. याशिवाय त्या गो आश्रयस्थान चालवतात आणि शाळा-कॉलेजांमध्ये हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीवर भाषणेही देतात.

ADVERTISEMENT

माधवींना नाही कोणतीही राजकीय पार्श्वभूमी

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे ओवेसी यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे, तर दुसरीकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माधवी लता आहेत. त्या स्वतः सक्रिय राजकारणी नव्हत्या. तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी मुस्लीम महिला गटांसोबत सहकार्य केल्याने त्या हैदराबादमध्ये प्रसिद्धीस आल्या. या प्रकरणी त्यांना शहरातील विविध भागात बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते.

तेलंगणात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली

2019 च्या निवडणुकीत भाजपने ओवेसी यांच्या विरोधात भागवत राव यांना तिकीट दिले होते. त्यांना एकूण 2,35,285 मते मिळाली, तर ओवेसी यांना 5,17,471 मते मिळाली होती. यावेळी भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या दशकात तेलंगणात भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 7 टक्के मते मिळाली होती, तर 2023 च्या विधानसभा निवडणुकीत 15 टक्के मते मिळाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने प्रथमच 8 जागा काबीज केल्या आहेत. ज्यामध्ये हैदराबादच्या आसपास चारमिनार, कारवां, एलबी नगर, राजेंद्रनगर, अंबरपेट, कुथबुल्लापूर आणि सनथनगर जागांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT