Nitin Gadkari : गडकरींऐवजी दुसरा उमेदवार? निरीक्षकांच्या प्रश्नाने चर्चांना उधाण
Nitin gadkari lok sabha news : नितीन गडकरी उमेदवार हवेत की, दुसरा हवा, अशी विचारणा पक्षाच्या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नितीन गडकरींच्या मतदारसंघात भाजपचे निरीक्षक

भाजपकडून नागपूर मतदारसंघाचा आढावा

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काय केली मागणी?
Nitin Gadkari Lok Sabha : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत तब्बल १९५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. पण, यात नितीन गडकरी यांचं नाव नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यातच भाजपच्या लोकसभा निरीक्षकांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी हवेत की दुसरा उमेदवार हवा? अशी विचारणा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना केली. त्यामुळे भाजपचा वेगळा सुरू आहे का? अशी चर्चा सुरू झालीये. (BJP asked office bearers whether they want Nitin Gadkari as their candidate or anyone else.)
भाजपच्या पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याबरोबर नितीन गडकरींचं नाव असेल, असे म्हटले जात होते. पण, तसे घडलेले नाही. इतर नेत्यांची नावे आहेत, मात्र गडकरींच्या नावाचा समावेश नाही.
ज्या राज्यातील उमेदवार भाजपने जाहीर केले, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची चर्चा केली जात असताना एक वेगळी माहिती समोर आली आहे.
गडकरी हवेत की दुसरा उमेदवार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय लोकसभा निरीक्षक नियुक्त केले आहेत. खासदार मनोज कोटक आणि माजी आमदार अमर साबळे यांच्याकडे नितीन गडकरींच्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. ते मतदारसंघात जाऊन स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे. सोबतच उमेदवारांविषयी मत जाणून घेत आहेत.