Lok Sabha Election: भाजपकडून तब्बल 195 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील...

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद
भाजपची महत्त्वाची पत्रकार परिषद
social share
google news

BJP Press Conference Lok Sabha Election: नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (2 मार्च) संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील मुख्य कार्यालयात एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. ज्याला आता सुरुवात झाली आहे. या पत्रकार परिषदेबाबत भाजपने तब्बल 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (bjp will make a big announcement about the lok sabha election 2024 candidates today an urgent press conference has been called at 6 pm)

 

LIVE UPDATE:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 • 16 राज्य आणि 2 केंद्रशासितमधील 195 जागांबाबत निर्णय झाला
 • पंतप्रधान मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार
 • 34 केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री यांची उमेदवारी निश्चित झाली आहेत.
 • या यादीत लोकसभा अध्यक्षांचा देखील समावेश आहे
 • 2 माजी मुख्यमंत्र्यांना देखील लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 
 • पहिल्या यादीत 28 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 • पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं नाहीत
 • मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लोकसभेची उमेदवारी
 • विदिशामधून देण्यात आली उमेदवारी 
 • शिवराजसिंह यांना मुख्यमंत्री पद न देण्यात आल्याने मध्यप्रदेशमध्ये भाजपविरोधात काहीशी नाराजी होती.
 • तीच नाराजी या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न
 • महाराष्ट्रातील भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपने दिली उमेदवारी  
   

 

Lok Sabha Election 2024 साठी भाजपकडून 195 उमेदवारांची यादी जाहीर

 

ADVERTISEMENT

 

भाजप 100 उमेदवार जाहीर करणार?

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव उमेदवारांच्या पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांचेही नाव या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधील वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, आझमगढ आणि गोरखपूरसह अनेक प्रमुख जागांसाठी उमेदवारांची नावे असतील. असे समजते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> अजितदादा माझं गृह खातं मागतील, पण मी त्यांना.. : फडणवीस

उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी 29 फेब्रुवारी रोजी दिल्ली भाजप मुख्यालयात पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. ही बैठक रात्री 8 वाजता सुरू झालेली आणि पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीत सुमारे 17 राज्यांतील लोकसभेच्या जागांवर चर्चा झाली आणि 155 हून अधिक जागांवर निर्णय घेण्यात आला, ज्याचा तपशील आज होणाऱ्या भाजपच्या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

भाजपच्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संघटनेचे सरचिटणीस बी.एल.संतोष, प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, सहप्रभारी आणि निवडणूक प्रभारी, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आसाम, उत्तराखंड आणि गोव्याचे मुख्यमंत्री यासाठी उपस्थित होते. बैठकीत उत्तर भारतातील सर्व राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या लोकसभा जागांवरही चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 जागा जिंकण्याचा करण्याचा नारा दिला आहे. 370 पेक्षा जास्त जागा एकट्या भाजपने जिंकण्याचं लक्ष्य आहे.

महाराष्ट्रातून कोणा-कोणाची नाव होणार जाहीर?

दरम्यान, भाजप पहिली यादी जाहीर केल्यास त्यामध्ये महाराष्ट्रातून कोणा-कोणाची नावं जाहीर करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. जर पहिल्या यादी मोदी, शाह यांची नाव जाहीर झाल्यास तसंच नाव नितीन गडकरी यांचं देखील जाहीर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा>> Gautam Gambhir : गौतम गंभीर राजकारणातून 'आऊट'

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लोकसभा जागा वाटपावरुन बरीच धुसफूस आहे. त्यामुळे येथील उमेदवारांची नावं पहिल्याच यादीत जाहीर केली जाणार नाहीत. कारण अद्यापही कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत नेमका फॉर्म्यूला ठरलेला नाही. त्यामुळे जर भाजपने पहिल्याच यादीत महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले तर त्याचा परिणाम महायुतीवर होण्याची शक्यता आहे. 

  follow whatsapp

  ADVERTISEMENT