बायकोनं नवऱ्याकडे 'त्या' एका वस्तूसाठी केली 10 हजार रुपयांची मागणी, पतीने कमी पैसे दिल्यानं संपवलं जीवन

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं तिच्या पतीकडे नवीन मोबाईल फोनची मागणी केली होती. पण पतीने फोन घेऊन देण्यासाठी कमी पैसे दिले होते, अशातच पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीकडे नवीन मोबाईलची मागणी 

point

पतीने कमी पैसे दिल्याने गळफास घेत संपवलं जीवन

Crime News : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका महिलेनं तिच्या पतीकडे नवीन मोबाईल फोनची मागणी केली होती. पण पतीने फोन घेऊन देण्यासाठी कमी पैसे दिले होते, अशातच पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. मृत महिलेचं नाव राधिका (वय 27) असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : रक्ताच्या थारोळ्यात व्हॅलेंटाईन्स डे! कारमध्ये सापडला प्रेमीयुगुलाचा मृतदेह; कोणी घातल्या गोळ्या?

पतीकडे नवीन मोबाईलची मागणी 

वृत्तानुसार, मृत राधिकाचा पती आशिष शर्मा हा नोकरीसाठी ओडिशामध्ये असतो. राधिका ही काही दिवसांपासून आपल्या पतीकडे नवीन मोबाईलची मागणी करत होती. नंतर तिने नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती, पण तिला 2 हजार रुपये देण्यात आले होते. आशिषची आई प्रेमो म्हणाली की, 'राधिकाला 10 हजार रुपयेच हवे होते. तिच्या पतीने तिला कमी पेसे दिले तेव्हा ती रागवली'. 

पतीने कमी पैसे दिल्याने गळफास घेत संपवलं जीवन

यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. राधिकाला तीन वर्षांचा मुलगा आहे, त्याच्या डोक्यावरून आईचं छप्पर उडून गेलं. या साध्या एका हट्टीपणामुळे पतीला मोठा परिणाम भोगावे लागत आहे. 

हे ही वाचा : चंद्रपूर : तरुणीचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध अन् लग्न दुसऱ्याशी, प्रियकराने नवऱ्याला 'ते' फोटो पाठवले, नंतर कपडे काढून मारलं

संबंधित घटनेची माहिती मिळताच गावाला मोठा धक्का बसला. घटनास्थळी काही लोक आले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले, नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृत्यूमागील ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp