Lok Sabha Election 2024: BJP च्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला स्थान नाही, पण महाराष्ट्रातील 'या' नेत्याला दिली उमेदवारी
Kripashankar Singh: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जी पहिली यादी जाहीर केली आहे त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, महाराष्ट्रातील बडे नेते असलेले कृपाशंकर सिंह यांना थेट उत्तर प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कृपाशंकर सिंह यांना लोकसभेचं तिकीट

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून दिली उमेदवारी

भाजपकडून 195 जणांची यादी
Lok Sabha Election 2024 Kripashankar Singh: मुंबई: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजपने तब्बल 195 उमेदवार जाहीर केले आहेत. पण या यादीत महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. पण असं असलं तरीही महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला थेट उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. (maharashtra has no place in bjp first list lok sabha election 2024 but kripashankar singh has been announced as a candidate from uttar pradesh jaunpur)
भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्या नेतृत्वात दिल्ली मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या 195 उमेदवारांची नावं जाहीर केली. पण त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेची घोषणा करण्यात आली नाही.
मात्र, असं असलं तरीही ज्यांनी महाराष्ट्रातच आपलं राजकीय करिअर घडवलं त्या कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिलं आहे.

खरं तर आतापर्यंत ज्या चर्चा सुरू होत्या त्यात कृपाशंकर सिंह यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र, त्यांना थेट उत्तर प्रदेशमधून तिकीट देण्यात आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.