Asaduddin Owaisi Exclusive : 'एक हैं तो सेफ हैं' या नाऱ्याला उत्तर, संभाजीनगरमध्ये ओवैसी म्हणाले "अनेक हैं तो...
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी मोदींना उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवैसींचा प्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेला उत्तर
असदुद्दीन ओवैसींचा शिंदेंवरही निशाणा
Asaduddin Owaisi Exclusive : विधानसभा निवडणुकीवरुन वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे आणि अशातच आता देशभरातील नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राच्या मैदानात उतरले आहेत. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची धुळ्यात पहिली सभा पार पडली. यासभेतून पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा नारा दिला. 'एक हैं तो सेफ हैं' म्हणत मोदींनी रणशिंग फुंकलं. त्यावर विरोधकांनी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला होता. त्यातच आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी हे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी मोदींना उत्तर दिलं आहे. (Asaduddin Owaisi replied pm narendra modi with Anek hain to akhand hain slogan)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Raj Thackeray : जो कुणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल...सदा सरवणकरांवर पहिला हल्ला, राज ठाकरे गरजले
देशातील दलित, आदिवासी, ओबीसी यांनी एक राहायला हवं. त्यांच्यात अंतर निर्माण करुन त्यांना कमजोर करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं असं नारा दिला होता. त्यानंतर आता इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत असदुद्दीन यांनी मोदींच्या या नाऱ्याला उत्तर दिलंय. अनेक हैं तो अखंड हैं असं म्हणत ओवैसींनी त्याचा अर्थ सांगितला. या देशाची विविधता या देशाची ओळख आहे, मात्र पंतप्रधान मोदींचा यावर विश्वास नाही. पंतप्रधान मोदी हे गोलवलकरांना मानणारे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारणीवर ते चालतात. फक्त मुस्लिमच नाही तर कुठल्याही प्रकारच्या विविधतेमध्ये पंतप्रधान मोदी विश्वास ठेवत नाहीत असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
हे ही वाचा >>Raj Thackeray: 'एक-दोन उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही', राज ठाकरे असं का म्हणाले?
हे वाचलं का?
एक हैं तो सेफ हैं म्हणत आहेत, हे तेच मोदी आहे जे म्हणाले होते, की विरोधक तुमचं मंगळसुत्र चोरुन नेतील. तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात तेव्हापासून आम्ही सेफ नाही असं ओवैसी म्हणाले आहेत. यावेळी ओवैसी यांनी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगा या नाऱ्यावरही टीका केली आहे. तसंच मोहम्मद पैंगंबर यांच्यावर टीका करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "जी व्यक्ति मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करते, त्याच व्यक्तिसोबत मुख्यमंत्री शिंदे दिसतात आणि सांगतात की, यांना कुणीही हात लावू शकत नाही." असं मोदी ओवैसी म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT