Raj Thackeray: 'एक-दोन उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही', राज ठाकरे असं का म्हणाले?

साहिल जोशी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगाबाबत भुवया उंचावणारं विधान केलं आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

'एक-दोन उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही'
'एक-दोन उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगाबाबत भुवया उंचावणारं राज ठाकरेंंचं विधान

point

पाहा भाजपबाबत काय म्हणाले राज ठाकरे

point

राज ठाकरेंनी CM शिंदेंचे टोचले कान

Raj Thackeray: मुंबई: 'एखाद-दोन उद्योग तिथे (गुजरात) गेल्याने असा काही फार मोठा महाराष्ट्रावर परिणाम होतोय असं काही नाही.' असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केलं आहे. ज्यावरून आता विरोधक मात्र त्यांना घेरण्याच्या तयारीत आहे. (exclusive interview why did raj thackeray say it doesnt matter if one or two industries move from maharashtra)

पाहा मुंबई Tak ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले 

'आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार?'

हे ही वाचा>> Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांना निवडणूक आगोची नोटीस, लाडक्या बहिणींबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार?

'सगळ्यात आधी उद्योग गेले नाहीच पाहिजे, पण एखाद-दोन उद्योग तिथे गेल्याने असा काही फार मोठा महाराष्ट्रावर परिणाम होतोय असं काही नाही. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या सगळ्यात मोठं राज्य आहे. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार?'

'जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp