Dhananjay Mahadik : महाडिकांना निवडणूक आयोगाची नोटीस, लाडक्या बहिणींबद्दल केलेलं वक्तव्य भोवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींबद्दल बोलणं महाडिकांना भोवणार

point

भाषणातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक नोटीस

point

वादग्रस्त विधानाबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागणार

Dhananjay Mahadik get ECI Notice : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा प्रचाराचा जोरही वाढत चालला आहे. त्यातच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारादरम्यान धनंजय महाडिकांनी केलेल्या एका वक्तव्यानं ते आता अडचणीत आले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली. "काँग्रेसच्या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांची माहिती घ्या,त्यांची व्यवस्था करतो" या वक्तव्याबद्दल महाडिकांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचाराता दिसल्या तर त्यांचे फोटो काढा… आम्ही त्यांची व्यवस्था करु. आमच्या सरकारचं खायचं आणि  त्यांचं गाण गायचं हे चालणार नाही" असं महाडिक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी धनजय महाडिक यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला जाण्याचीही शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Raj Thackeray Exclusive : 'माझी पाचवी निवडणूक, तुमची पहिली...', CM शिंदेंना राज ठाकरेंनी थेट सुनावलं!

भाजपचे खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक यांच्या प्रचार सभेला उपस्थित होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी भाषण करताना थेट महिलांना इशारा दिला होता. काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यात महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार असं म्हणत धनंजय महाडिक यांनी थेट धमकीच दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यानंतर धनंजय महाडिक यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची निवडणूक आयोगाने तात्कळ दखल घेतली. आज त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या वक्तव्याप्रकरणी नोटीस देऊन त्यांना आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


धनंजय महाडिक काय म्हणाले होते?

"तुम्हाला सांगतो, इथे काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यामध्ये महिला जर दिसल्या.. ज्या 1500 रुपये घेतात आपल्या योजनेचे... त्यांचे फोटो काढून घ्या, त्यांचे नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार, अनेक बाया छाती बडवायला लागल्यात, आम्हाला नको पैसे, आम्हाला सुरक्षा पाहिजे... पैसे नकोत? पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेत, रॅलीत महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढयचे, आम्ही व्यवस्था करु. जर कुणी लय मोठ्यानं भाषण करायला लागली, किंवा दारात कुणी आली तर, लगेच एक फॉर्म द्यायचा, बाई याच्यालर वर खाली सही कर म्हणायचं, लगेच उद्या बंद करतो पैसे... आमच्याकडं काय लई पैसे झालेले नाहीत"  

हे वाचलं का?

 

महाडिकांनी माफीही मागितली...

"धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होण्यास सुरू झाल्यानंतर त्यांनी आता माफी मागितली आहे.सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत. "सर्वप्रथम माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर त्यांची मी बिनशर्त माफी मागतो. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकारमुळेच यशस्वी झाली असल्याचे ठामपणे नमूद करताना विशेषतः वोट जिहाद करणाऱ्या महिलांच्या प्रती आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मी माझ्या वैयक्तिक, राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नीमार्फत गेली अनेक वर्षे भगीरथी महिला सस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी नेहमीच चांगले काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. तीन महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणचावत माझ्या ह्या प्रयत्नांची दखल घेऊन माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अवाचाई चरणी भी प्रार्थना करतो" असं म्हणत धनंजय महाडिक यांनी माफी मागितली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT