Assembly Elections Exit Poll 2024 : सरकार 'यांचं' येणार! 'या' एक्झिट पोलने कोणाची उडवली झोप?
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला किती टक्के मतदान मिळालं याचा टक्का समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात उद्या कुणाचं सरकार येणार?

अपक्ष आणि लहान पक्षांना 18 टक्के मतदान

मतदानाच्या टक्केवारीनं कुणाची उडवली झोप?
Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सध्या देशाचं लक्ष लागून आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या सर्व घडामोडींनंतर आणि विशेषत: पक्षफुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यानंतर लोकांचं मत कुणाला मिळणार हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. उद्या 23 मे रोजी हे निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाकडूनही मतदानाच्या आकडेवारीचे तपशील समोर आले आहेत. ज्यामाध्यमातून राज्याच्या निकालाचं विश्लेषण करणं अधिक सोपं झालं आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आणि इतर डेटाही समोर आला आहे. त्यामाध्यमातून अनेक गोष्टींचा कल समोर आला आहे. विशेष म्हणजे कुणाला किती मतदान मिळालं हे देखील समोर आलं आहे.
हे ही वाचा >>Maharashtra Elections Exit Poll : कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय? अख्खी यादी आली समोर
लोकनिती सीडीएस या संस्थेनं केलेल्या राज्याच्या मतदानाच्या सर्व्हेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे वेगवेगळे कंगोरे समोर आले आहेत. त्यामध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती टक्के मतदान मिळालं हे स्पष्ट झालं आहे. या सर्व्हेमधून समोर आलेल्या आकडेवारीमध्ये नेमकं काय काय तपशील आणि त्याचा अर्थ काय होतो हे जाणून घेऊ.