Nana Patole: निकालाआधीच मविआत CM पदावरून रस्सीखेच! पटोले म्हणाले, "काँग्रेसचा मुख्यमंत्री..."

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nana Patole On MVA Chief Minister Candidate
Nana Patole On MVA Chief Minister Candidate
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत नान पटोलेंचं मोठं विधान

point

महाविकास आघाडीत कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रीपदाची माळ?

point

नाना पटोलेंच्या विधानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Nana Patole On Chief Minister Post : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी काल बुधवारी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती पहिल्यांदाच आमनेसामने आल्याने संपूर्ण महाराष्ट्राला या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारावरून मतभेद होत असल्याचं समोर आलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले, नवीन सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही हे मान्य करणार नाही.

ADVERTISEMENT

नाना पटोले म्हणाले, "महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वात आघाडीचं सरकार बनेल. राज्यात काँग्रेसचे सर्वात जास्त आमदार निवडूव येतील. आघाडीचं सरकार येईल.", पटोलेंच्या या विधानाचा राऊतांनी समाचार घेत म्हटलं, आम्ही हे मान्य करणार नाही. कोणीच मान्य करणार नाही. आम्ही बसून यावर निर्णय घेऊ. आघाडी सरकार नंतर बैठक घेऊन निश्चित करेल. राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे यांनी नाना पटोलेंना मुख्यमंत्री होण्याबाबत सांगितलं असेल, तर तसं त्यांनी जाहीर करावं.

हे ही वाचा >> Today Gold Rate: मतदान संपताच सोन्याचे दर कडाडले; आजचा 1 तोळ्याचा भाव वाचून डोकंच धराल

नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात याआधीही राजकीय मतभेद झाले आहेत. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राऊतांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर नाना पटोलेंनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. ते म्हणाले, संजय राऊतांनी कोणत्या आधारावर तसं म्हटलं मला माहित नाही. पण तुम्ही सार्वजनिकपणे आघाडीबाबत अशाप्रकारचे आरोप लावू शकत नाहीत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Today Gold Rate: मतदान संपताच सोन्याचे दर कडाडले; आजचा 1 तोळ्याचा भाव वाचून डोकंच धराल

65 टक्के मतदान

बुधवारी पार पडलेल्या राज्याच्या निवडणुकीत यावेळी 65 टक्के मतदान झालं. भाजपच्या नेतृत्त्वातील महायुती सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे. तर विरोधी पक्ष महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये चांगलं यश मिळवलं होतं. महाराष्ट्रात महायुतीच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT