EVM: 12 आमदारांना सारखीच मतं कशी मिळाली? रोहित पवारांनी यादीच दाखवली!

मुंबई तक

निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सुरू असताना आमदार रोहित पवारांनी नाशिकमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना सारखीच मतं कशी मिळाली? असा सवाल विचारला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

point

नाशिकमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना सारखीच मतं कशी मिळाली? रोहित पवारांचा सवाल

point

नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता

नाशिक: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करायाला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी नाशिकमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांना सारखीच मतं कशी मिळाली? असा सवाल करताना त्याची आकडेवारी जाहीर केली. महायुतीने नाशिक जिल्ह्यात जिंकलेल्या 12 आमदारांची नावं व त्यांना मिळालेली मतं उघड केली आहे. त्यामुळं आता यावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. (evm controversy how did 12 mla get the same number of votes rohit pawar showed the list)

रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, 

गुजराती #EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का?

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो.

हे ही वाचा>> Maharashtra New CM: भाजपचं ठरलं, 'या' नावावर होणार शिक्कामोर्तब... शिंदेंचा पत्ता कापला जाणार?

निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं? काय खोटं? हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp