Govindgiri Maharaj : "पप्पू नावाचं एक घुबड देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून...", गोविंदगिरी महाराजांची राहुल गांधींवर टीका?
Govindgiri Maharaj on Rahul Gandhi: गोविंदगिरी महाराज यांनी नाव न घेता देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राहुल गांधी यांचा घुबड म्हणून उल्लेख?

पप्पू म्हणत गोविंदगिरी महाराजांची टीका

गोविंदगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
Govindgiri Maharaj on Rahul Gandhi : अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलेल्या एका वक्तव्याची आता चांगलीच चर्चा सुरू आहे. गोविंदगिरी महाराज यांनी नाव न घेता देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्याचं बोललं जातंय. पप्पू नावाचं एक घुबड देशात जातीपातीत(caste difference) भेद निर्माण करायचा प्रयत्न करतंय असं वक्तव्य गोविंदगिरी महाराज यांनी केलं आहे.
हे ही वाचा >>Sadabhau Khot : टीका करताना बरळलेल्या सदाभाऊंची दिलगिरी, म्हणाले ही गावाड्याची भाषा, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला...
गोविंदगिरी महाराज हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशावर वेगवेगळे संकटं असल्याचं बोलताना नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जातंय. "देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी किती विदेशी शक्ती गिधाडांसारख्या टपून बसलेल्या आहेत. लचके तोडण्यासाठी पुढे पुढे घोंगावतायत. त्यांच्यातलं एक घुबड, पप्पू नावाचं, देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंडून देशाच्या संस्कृतीचा नाश करण्यासाठी जातीपातीत कशाप्रकारे मतभेद निर्माण करावेत यासाठी प्रयत्न करतोय" असं वक्तव्य गोवंदिगिरी महाराज यांनी केलं आहे.