Maharashtra Assembly Election 2024: महायुतीच्या 288 उमेदवारांची संपूर्ण यादी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सध्या बरंच गोंधळाचं वातावरण आहे. अशावेळी महायुतीचे कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महायुतीमध्ये कोणाला किती जागा?

पाहा कोणत्या मतदारसंघात महायुतीचा कोण उमेदवार

महाराष्ट्राच्या निवडणुकीत अभूतपूर्व परिस्थिती
Maharashtra Assembly Election 2024: मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती युती ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 148 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 85 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 51 जागा लढवत आहे. उर्वरित 4 जागा महायुतीच्या इतर मित्रपक्षांना देण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या हफ्त्यात 1500 ऐवजी 2100 रूपये मिळणार?
महाविकास आघाडी (MVA)ही सध्या विरोधी पक्षात आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या NCP (SP) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता आला. त्यापाठोपाठ त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 44 आणि 54 जागा मिळाल्या होत्या.