Maharashtra Election Exit Poll Results 2024: कोणाचा विजय, कोण पराभूत? एक्झिट पोलमधून सगळंच क्लिअर!
Exit Poll 2024 | Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. जाणून घ्या नेमकं कोणाला किती जागा मिळणार.
ADVERTISEMENT

Exit Poll Results 2024 Latest Updates: एक्झिट पोलमध्ये कोणाचा विजय, कोण पराभूत
▌
बातम्या हायलाइट

एक्झिट पोलचे आकडे आले समोर

एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात नेमकी कोणाची सत्ता?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपन्न
Maharashtra Exit Poll Results 2024: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं आहे. मतदानाची मुदत संपल्यानंतर आता एक्झिट पोल देखील समोर आला आहे. तर याच एक्झिट पोलनुसार आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोणाची सत्ता येणार.
महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे. अशावेळी युती किंवा आघाडी करूनच राज्यात सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे यंदा जनतेने नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहूयात.