Maharashtra Election Exit Poll Results 2024: कोणाचा विजय, कोण पराभूत? एक्झिट पोलमधून सगळंच क्लिअर!
Exit Poll 2024 | Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून आता एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. जाणून घ्या नेमकं कोणाला किती जागा मिळणार.

बातम्या हायलाइट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं

सर्व एक्झिट पोलचे आकडे आले समोर

पाहा कोणत्या सर्व्हेमध्ये कोणाला किती जागा
Maharashtra Exit Poll Results 2024: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं आहे. मतदानाची मुदत संपल्यानंतर आता एक्झिट पोल देखील समोर आला आहे. तर याच एक्झिट पोलनुसार आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोणाची सत्ता येणार.
महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच सहा प्रमुख पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे. अशावेळी युती किंवा आघाडी करूनच राज्यात सरकार स्थापन करावं लागेल. त्यामुळे यंदा जनतेने नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे आपण एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहूयात.
हे ही वाचा>> Maharashtra Election CNX Exit Poll Results 2024: महाविकास आघाडीला मोठा धक्का, महायुती जिंकणार 'एवढ्या' जागा: सर्व्हे
महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान संपन्न झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 58.22 टक्के मतदान झाले. त्यामुळे आता उमेदवारांचे भवितव्य हे ईव्हीएममध्ये सील झाले आहे, आता प्रतीक्षा आहे 23 नोव्हेंबरची, कारण याच दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
पाहा सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी
1. MATRIZE चा Exit Poll - MATRIZE च्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीला 150-170 जागा, MVA 110-130 जागा आणि इतरांना 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
2. Chanakya Strategies चा Exit Poll - चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 152 ते 160 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील, तर इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
3. JVC चा Exit Poll - तर, JVC च्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 159 जागा मिळतील, MVA ला 116 जागा मिळतील आणि इतरांना 13 जागा मिळतील असा अंदाज आहे. मराठवाड्यातील 46 जागांपैकी महायुतीला 19 जागा, एमव्हीएला 25 आणि इतरांना 2 जागा मिळू शकतात. ठाणे-कोकणात महायुतीला मोठा फायदा होताना दिसत आहे. येथे 39 जागांपैकी महायुतीला 25, एमव्हीएला 11 आणि इतरांना 3 जागा मिळू शकतात.
-
Electrol Edge Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 118 जागा मिळू शकतात
भाजप - 78
शिवसेना (शिंदे गट) - 26
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 14
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील
काँग्रेस - 60
शिवसेना (ठाकरे गट) - 46
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 44
- Poll Diary Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 122-186 जागा मिळू शकतात
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-28
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 69-121 जागा मिळतील
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 25-39
- CNX Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 160-179 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 100-119 जागा मिळतील
-
P - Marq Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 137-157 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 126-146 जागा मिळतील
-
LokShahi - Rudra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 128-142 जागा मिळू शकतात
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 18-22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 125-140 जागा मिळतील
काँग्रेस - 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 38-42
-
JVC - Times Now Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 159 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 116 जागा मिळतील
-
Chanakya Strategies Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 152-160 जागा मिळू शकतात
भाजप - 90
शिवसेना (शिंदे गट) - 48
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 22
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 130-138 जागा मिळतील
काँग्रेस - 63
शिवसेना (ठाकरे गट) - 35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 40
-
Dainik Bhaskar Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 125-140 जागा मिळू शकतात
भाजप - 80-90
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 15-20
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळतील
काँग्रेस - 58-60
शिवसेना (ठाकरे गट) - 30-35
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 50-55
-
Prajatantra Exit Poll:
महायुती - या सर्व्हेनुसार महायुतीला 127 जागा मिळू शकतात
महाविकास आघाडी - या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 149 जागा मिळतील
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याबाबतही JVC ने सर्वेक्षण केले आहे. JVC च्या सर्वेक्षणानुसार, 32.6 टक्के लोकांनाी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. त्याचवेळी 22.1 टक्के लोकांना उद्धव ठाकरे, 18.7 टक्के देवेंद्र फडणवीस आणि 7.2 टक्के लोकांना नाना पटोले मुख्यमंत्री म्हणून झालेलं पाहायचं आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Exit Poll Results 2024 LIVE Updates: महायुतीचा बोलबाला? पण मॅजिक फिगर कुणालाच नाही? एक्झिट पोल काय?
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत
महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती (भाजप, शिंदे गट, अजित गट) आणि विरोधी महाविकास आघाडी (उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस) यांच्यात लढत आहे. महायुतीत भाजप 149, शिवसेना 81 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहे.
तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने 101 जागांवर, शिवसेनेने (UBT) 95 जागांवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने 86 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्राच्या लढाईत बहुजन समाज पक्ष आणि एआयएमआयएमसह छोटे पक्षही आहेत. बसपने 237 तर AIMIM ने 17 उमेदवार उभे केले आहेत. 288 जागांसाठी 4,136 उमेदवार रिंगणात आहेत.