Exit Poll: 'या' मतदारसंघात 'हे' उमेदवार होणार विजयी, यादीच आली समोर: सर्व्हे
candidates wining list | Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. राज्यातील 15 महत्त्वाच्या मतदारसंघात नेमकं कोण जिंकणार याची एक यादी आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील 15 महत्त्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

महत्त्वाच्या 15 मतदारसंघात 'हे' उमेदवार होणार विजयी

प्रजातंत्रचा नेमका एक्झिट पोल काय?
Maharashtra Election 2024 Exit Poll wining Candidate list: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. ज्यामध्ये राज्यातील 60 टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. दरम्यान, मतदानानंतर काही एक्झिट पोल हे समोर आले आहेत. पण यापैकी प्रजातंत्र या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील 15 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये नेमकं कोण जिंकणार याची यादीच जाहीर केली आहे.
प्रजातंत्रचा नेमका एक्झिट पोल काय?
प्रजातंत्रने जो एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे त्यात महाविकास आघाडी राज्यातील सत्ता मिळवेल असा अंदाज व्यक्त केला आहे. सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला राज्यात 149 जागा मिळतील. तर महायुतीला 127 जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Election CNX Exit Poll Results 2024: महाविकास आघाडीला मोठा धक्का, महायुती जिंकणार 'एवढ्या' जागा: सर्व्हे
कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळतील?
महाविकास आघाडी
- मराठवाड्यात 30 जागा मिळतील
- मुंबईत 18 जागा मिळतील
- उत्तर महाराष्ट्र 23 जागा मिळतील
- ठाणे-कोकण 17 जागा मिळतील
- विदर्भ 31 जागा मिळतील
- पश्चिम महाराष्ट्र 30 जागा मिळतील
महायुती