Eknath Shinde यांची तब्येत बिघडली! नेमकं होतंय तरी काय?
Eknath Shinde Healh Update: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावात दाखल झाले. परंतु, शिंदे गावी गेल्यावर त्यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदेंची तब्येत अचानक का बिघडली?
डॉक्टरांनी सांगितली 'ही' महत्त्वाची कारणे
दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं
Eknath Shinde Healh Update: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सर्वांनाच मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची प्रतिक्षा लागलीय. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावात दाखल झाले. परंतु, शिंदे गावी गेल्यावर त्यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, डॉक्टरांनी शिंदेंची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं आहे. शिंदेंना विश्रांतीची आवश्यकता असल्याचंही डॉक्टर पार्टे यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT
"शिंदेंची तब्येत ठीक आहे. त्यांना 99 डिग्री सेल्सियसचा ताप होता. सलाईद्वारे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे व्हायरल इंफेक्शन असल्याने त्यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत आहे", अशी माहिती शिंदेंचे फॅमिली डॉक्टर पार्टे यांनी दिलीय. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक घेतल्यानंतर ते मुंबईत परतले. त्यानंतर शिंदे थेट सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरेगावात पोहोचले. त्यामुळे मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द करण्यात आली होती. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. परंतु, शिवसेना शिंदे गटाने भाजपकडे गृह मंत्रालयाची मागणी केल्याने महायुतीत पेच निर्माण झाल्याचं समजते.
हे ही वाचा >> Maharashtra CM: कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री? फडणवीस की मोहोळ? 'या' तारखेला उधळणार गुलाल!
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही उपस्थित होते. बैठकीत शिंदेबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही, अशी चर्चा आहे. कारण फडणवीसांनी अमित शाहा यांचं स्वागत करताना शिंदेंचा चेहरा पडल्याचं व्हायरल फोटोंच्या माध्यमातून समोर आलं होतं. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडणारे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार नाहीत, असा सूर शिवसेनेच्या शिंदे गटातील काही नेत्यांनी आवळला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट, म्हणाले, "त्यावेळी EVM बद्दल कोणी..."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT