Nitin Gadkari : पीक वाढलं, तसे रोगही वाढलेत... भाजपमधील इनकमिंगबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

अनुजा धाक्रस

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपमधील इनकमिंगबद्दल काय म्हणाले नितीन गडकरी?

point

नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा

point

संविधानाच्या मुल्यांची आठवण करुन देत काय म्हणाले गडकरी?

Nitin Gadkari : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षात राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी गाव पातळीवरील पदाधिकारी-कार्यकर्त्यांपासून ते देशपातळीवरील अनेक नेते इतर पक्ष सोडून भाजपमध्ये आल्याचं दिसलं. त्यातच आता भाजपमध्ये होणाऱ्या 'कलंकित' नेत्यांच्या इनकमिंगवरुन नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप पक्ष मोठ्या वेगानं पुढे जातोय, मात्र भाजपची अवस्था सध्या रोगाने ग्रासलेल्या पिकासारखी झाली आहे, संघटनेला कीटकनाशक फवारुन हे पीक साफ करणंही गरजेचं झालं आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Manoj Jarange : कुणाला पाडायचं ते जरांगेंनी स्पष्ट सांगितलं, पत्रकार परिषदेत काय काय मुद्दे मांडले?


भाजप सध्या राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहे. सगळेच पक्ष मोठ्या ताकदीने निवडणूक लढवतायत. मात्र त्यातच आता भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. नितीन गडकरी म्हणाले, "भाजपच्या वेगाने झालेल्या विस्ताराबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जसं पीक वाढतं, तसे रोगही वाढतात. भाजपकडे सध्या मोठ्याप्रमाणात पीक आहे. पण पीक वाढताना रोगांची लागणही होते. त्यामुळे कीटकनाशक फवारावं लागतं." त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्यांवर आहे, याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.


सरकार धर्मनिरपेक्ष असावं : नितीन गडकरी

हे वाचलं का?

नितीन गडकरी यांनी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांची आठवण करुन देत सांगितलं की, सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे, कोणतीही व्यक्ती कधीही धर्मनिरपेक्ष असू शकत नाही, परंतु राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्षच असलं पाहिजे. विधानसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवर मला विश्वास आहे. इथल्या निवडणुकीत माझी काहीही भूमिका नाही, कारण राज्यातले नेते सक्षम आहेत आणि त्यांना सध्या माझ्या मदतीची गरज नाही. पण जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी त्यांना मदत करेन, असं गडकरी म्हणाले. 

 

ADVERTISEMENT

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत. ज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. या पक्षातले बडे नेते, आमदार भाजपसोबत आलेत. त्यावेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. अजित पवार यांना सोबत घेण्यावरुन भाजपमध्ये मोठी अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती. संघाकडूनही तशी स्पष्ट भूमिका व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आता नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याचा नेमका काय अर्थ काढला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT