Ramdas Kadam : 'विधानसभेत 100 जागा मिळाल्या नाहीतर...', रामदास कदमांचा इशारा; महायुती टिकणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ramdas kadam on vidhan sabha seat if 100 seats not given we will fight all 288 seats
भाजपच्या नेत्यांच्या हट्टापायी शिवसेना भाजपचं नुकसान झालं
social share
google news

Ramdas Kadam on Vidhan Sabha Seat : सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते का? असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत जर सेनेला 100 जागा दिल्या नाहीत तर सर्वच जागा आमच्या आम्ही प्रत्येक ठिकाणी लढू, असा थेट इशाराच कदम यांनी भाजपला दिला आहे. (ramdas kadam on vidhan sabha seat if 100 seats not given we will fight all 288 seats)

रामदास कदम एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा भाष्य केले आहे. काल मी एकनाथ शिंदे यांना हात जोडून विनंती केली. लोकसभेत जे झालं ते भविष्यात होता कामा नये. आपल्याला शक्य असेल तर मला घेऊन जा मोदी-शाहांकडे, मी त्यांना विनंती करेन, असे रामदास कदम यांनी सांगितले. 

हे ही वाचा : 'वायकरांचा विजय संशयास्पद', गजानन कीर्तिकर हे काय बोलून गेले?

भाजपच्या जागा होत्या, त्या दोन महिने आधीच जाहीर झाल्या. त्यांच्या उमेदवारांना काम करण्याची संधी मिळाली. पण एकनाथ शिंदेंना अगदी शेवटी 15 जागा दिल्या गेल्या. या जागांवर पण भाजपचे उठले आणि त्या जागा आम्हाला पाहिजे. ठाणे आमचं, कल्याण, हिंगोली, रायगड, नाशिक आमचचं आहे. हे अतिशय घृणास्पद होतं. आम्ही विश्वासाने तुमच्यासोबत आलोय. पण एकनाथ शिंदेंवर जबाबदारी दिली असती तर आणखी 5 जागा वाढल्या असत्या. पण भाजपच्या नेत्यांच्या हट्टापायी शिवसेना भाजपचं नुकसान झालं,असा आरोप रामदास कदम यांनी केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : दानवेंनी दिली मोठी बातमी, कोअर कमिटीमध्ये निघाला मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय

रामदास कदम यांनी अजित पवारांवर विधान केल्यानंतर वाद पेटला होता. आता या विधानावर त्यांनी सारवासारव केली आहे. रामदास कदम म्हणाले की, अजित पवार यांची प्रशासनावर पकड चांगली आहे, ते चांगलं काम करतात. माझं म्हणणं एवढंच होतं की, त्यांना महायुतीत घ्यायला थोडा उशीर झाला असता तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं आम्हाला मिळाली असती. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, ते बिचारे जॅकेट घालून बसले नसते. 9 मंत्रिपदं मिळाली असती तर त्यामुळे शिवसेनेची बांधणी अधिक भक्कम झाली असती, असे कदम म्हणाले. 

शिवसेनेला येत्या विधानसभेच्या निवडणूकीत 100 जागा हव्यात असे सांगताना रामदास कदम म्हणाले की, आमच्याकडे आता 50 आमदार आहेत. गेल्या वेळी आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आता आम्हाला 100 जागा हव्या आहेत. त्या जागा दिल्या नाही तर सगळ्या जागा आमच्याच समजू,असा इशारा रामदास कदम यांनी भाजपला दिला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT