Exclusive: BJP च्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय, दानवेंनी दिली मोठी बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP च्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय,
BJP च्या कोअर कमिटी मीटिंगमध्ये मातोश्रीच्या 'त्या' बैठकीचा विषय,
social share
google news

Raosaheb Danve: मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुतीची बरीच पडझड झाली. त्याच गोष्टीचा आढावा हा दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने घेतला. ज्यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीला बोलावण्यात आलं होतं. ज्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचाही समावेश होता. खरं तर कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही... पण याच बैठकीतील एक मोठी बातमी स्वत: रावसाहेब दानवे यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना दिली.. (topic of amit shah and uddhav thackeray matoshree meeting in bjp core committee meeting raosaheb danve made big news)

2019 विधानसभा निवडणुकीनंतर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना वेगळी झाली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असा दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह यांच्यासोबत 'मातोश्री'वर जी बैठक झाली होती तेव्हा अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरला होता.

हे ही वाचा>> Vijay Waddetiwar : ''सगेसोयरे टीकणार नाही मग जीआर कशाला काढताय''

दरम्यान, याच मातोश्रीच्या बैठकीचा विषय हा मंगळवारी (18 जुलै) दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत देखील निघाला. जे स्वत: रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा मुंबई Tak चावडीवर बोलताना रावसाहेब दानवेंनी दिली मोठी माहिती

प्रश्न: 2019 ला मातोश्रीवर अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली बैठक हे गुपित एवढं मोठं आहे की, ज्याबाबत नेमकं सत्य काय हे अद्यापही महाराष्ट्राला कळू शकलेलं नाही.. तुम्हीही तेव्हा मातोश्रीवर होता.. याबाबत तुमचं व्हर्जन काय आहे?

रावसाहेब दानवे: मातोश्रीची ती बैठक.. कालही आमच्या बैठकीत (कोअर कमिटीची बैठक) हा विषय निघाला..  कालचा विषय नका विचारू.. मी सगळा संदर्भ सांगतो ना.. 

ADVERTISEMENT

 

विषयाने विषय निघत असतात.. काल आमच्या बैठकीत हाही विषय (मातोश्रीच्या बैठकीचा) निघाला होता. की, उद्धव ठाकरे असं म्हणतात की, आम्हाला मुख्यमंत्री पद देऊ कबूल केलं होतं. त्यावेळेस मी अध्यक्ष होतो.. मी अध्यक्ष असताना.. मी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, चंद्रकांतदादा, आशिष शेलार अशी आमची एक टीम मातोश्रीवर गेली.. त्यांची पण एक टीम मातोश्रीवर हजर होती. 

मी असं म्हटलेलो तेव्हा त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली.. की, रावसाहेब दानवे आले असतील तर मला माहीत नाही. बाहेर बसले, कुठे बसले.. 

ADVERTISEMENT

अहो हे तर आता त्या शरद पवारांच्या दरात जाऊन बसून राहिले.. हॉटेलमध्ये तिथे संजय राऊत खेटरं काढतो तिथं जाऊन हे बसू राहिलेत.. आम्ही तरी मातोश्रीवर जात होतो..

हे ही वाचा>> Maharashtra News Live : "अजितदादांमुळे तुमची लंगोट तरी वाचली", महायुतीत नवा संघर्ष

ज्या ठिकाणी संजय राऊत खेटरं काढतात ना त्या ठिकाणी बसतात हे आता.. हे काय म्हणतात आम्हाला बाहेर बसवलं होतं म्हणून.. 

आम्ही आत गेलो.. बसलो.. अमितभाईला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, साहेब दोन मिनिटं आत बसूयात.. दोघं आतमध्ये गेले आणि आतून जाऊन चर्चा करून आले आणि म्हणाले की, चला पत्रकार परिषद घेऊयात..  

त्यांनी विषय काढला होता.. अमितभाईंनी सांगितलं होतं की, फॉर्म्युला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ठरवलेला आहे.. ज्याचे जास्त आमदार येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. मुख्यमंत्री कोणाचा होईल हे मी सांगत नाही.. पण भाजपकडे मुख्यमंत्री पद आहे. आमचे जास्त आमदार आले तर आमचा मुख्यमंत्री होणार. 

संपूर्ण निवडणुकीत त्यांचे सगळे लोकं व्यासपीठावर असताना मोदीजी, अमितभाई त्यांनी.. आम्ही सगळ्या लोकांनी सांगितलं की, या ज्या निवडणुका लढतो या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढतो. आमचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. तेव्हा कोणी आक्षेप नाही घेतला. 

आठ वाजता, नऊ वाजता, दहा वाजता.. अकरा वाजता जेव्हा निकाल यायला लागले.. तोपर्यंत बोलणं सुद्धा सुरू होतं फोनवर.. एकमेकांशी पत्रकार परिषदेबाबत.. किती वाजता घ्यायची. एक वाजता घ्यायची की दोन वाजता घ्यायची.. 

पण जसजसे निकाल असे यायला लागले की, आमच्याशिवाय सरकार बनत नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की, तुमची पत्रकार परिषद तुम्ही घ्या.. मी माझी घेऊन टाकतो.. यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की, आमचे सगळे पर्याय खुले आहेत म्हणून...

आम्ही कधीच मान्य केलं नव्हतं.. कारण आमचे माणसं जास्त निवडून आले होते.. युतीचा फॉर्म्युला प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवला होता.. ज्याचे जास्त माणसं निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री म्हणून.. 

1995 ला त्यांचा मुख्यमंत्री झाला.. त्यांची माणसं जास्त होती.. त्यात गुपित काय.. अनेकवेळा सांगितलंय मी.. त्यात लपवण्यासारखं काय? पण त्यांना हे बोलणं पसंत पडत नाही.. लगेच प्रतिक्रिया देतात ते.. 

प्रश्न: देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, रश्मी वहिनींसमोर डेमो झाला होता.. पत्रकार परिषदेत काय बोलायचं वैगरे हे ठरलं होतं... 

रावसाहेब दानवे: आम्ही हॉटेलमध्ये बसलेलो असताना माणसं डेमो करायला गेले होते. काय-काय बोलायचं.. याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही म्हणून... पण इतक्या खोलात कशाला जाता तुम्ही आता.. 

प्रश्न: ठाकरेंना सोडल्यामुळे महाराष्ट्रात तुमचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटतं? 

रावसाहेब दानवे: आम्हाला सोडल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय की नाही हे त्यांना विचारा.. म्हणजे हिशोब पुरा होऊन जाईल. दोघांचंही नुकसान झालं. 

त्यांनी हिंदुत्व सोडलं.. आता कुठे भाषा करतात ते.. ऐकलं ना सभेत काय बोलतात ते.. माझ्या देशभक्तांनो.. माझ्या हिंदू बांधवांनो का नाही म्हणले? त्यांच्या सभेतला पहिला शब्द असतो माझ्या हिंदू बांधवांनो.. कुठे गेलं हिंदुत्व? सगळं सोडलं आता त्यांनी आता.. 

कोअर कमिटीच्या बैठकीत 'मातोश्री'च्या मीटिंगचा विषय का निघाला? 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नसल्याबद्दल दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाने भाजपच्या कोअर कमिटीला पाचारण केलं होतं. मात्र, असं असताना पाच वर्षांपूर्वी मातोश्रीवर जी बैठक झाली होती तिचा विषय नेमका का निघाला? असा सवाल उपस्थित होत आहे.. 

मातोश्रीवरच्या त्या बैठकीत नेमकं काय घडलं होतं याचा दोन बाजू आहेत. एक उद्धव ठाकरेंची तर दुसरी भाजपची.. असं असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या बैठकीचा नेमका विषय का निघाला? आता त्याचा प्रचारात नेमका कसा वापर केला जाईल हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT