Vijay Waddetiwar : ''सगेसोयरे टीकणार नाही मग जीआर कशाला काढताय'', महाजनांच्या विधानावरून वड्डेटीवारांनी शिंदेंना घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

vijay waddetiwar criticize cm eknath shinde girish mahajan on jalana obc protest laxman hake jalana wadigodri obc reservation
आंदोलनस्थळी आज काँग्रस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आले होते.
social share
google news

Vijay Waddetiwar Meet Laxman Hake, OBC Reservation : गौरव साळी, जालना : सगेसोयऱ्यांचे आरक्षण न्यायालयात टीकणार अशी भूमिका गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी बुधवारी मांडली होती. महाजन यांच्या याच भूमिकेचा धागा पकडत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनी सरकारला घेरलं आहे. ''सरकारमधला एक मंत्री म्हणतो सगेसोयऱ्यांचे आरक्षण टीकणार नाही, मग जीआर काढताच कशाला'', असा सवाल विजय वड्डेटीवारांनी सरकारला केला आहे. तसेच ''आज आंदोलनाला आठवडा उलटूनही तुमचे हातपाय हलत नसतील, तुमचे पाय जर आंदोलनस्थळी येत नसतील तर नेमकी तुमची भूमिका काय आहे? तुमच्या मनात काय आहे. हे स्पष्ट करा''? अशी आक्रमक भूमिका विजय वड्डेटीवारांनी (Vijay Waddetiwar) घेतली. (vijay waddetiwar criticize cm eknath shinde girish mahajan on jalana obc protest laxman hake jalana wadigodri)  

जालन्याच्या वडीगोद्री येथे गेल्या 6 दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरु आहे. या उपोषणस्थळी आज काँग्रस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आले होते. यावेळी आंदोलन स्थळावरून वड्डेटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला होता. या फोनमधील सभाषणानंतर सरकारचं शिष्टमंडळ उद्याचं हाकेंकडे पाठवतो, असे मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितल्याचे वड्डेटीवार यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Ravindra Waikar : "वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका", थेट लोकसभा महासचिवांना नोटीस

ओबीसीमध्ये जन्मलेला कार्यकर्ता म्हणून ओबीसींच्या मागे उभं राहणे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता पद येत असतात जात असतात, सत्ता पदाचा आम्ही कधी विचार केला नाही. मंत्री पदाची  पर्वा न करता समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेलो आहे, असे वड्डेटीवार यांनी यावेळी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वड्डेटीवार पुढे म्हणाले, ''सगेसोयरेंच्या विषयावर गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. जर एक सरकारमधला मंत्री म्हणतो की सगेसोऱ्यांचे आरक्षण टीकणार नाही, मग टीकणार नसेल तर जीआर काढताच कशाला? आमच्या हक्काचे काढून घेतायत असे वातावरण कशाला निर्माण करता?  याचे सरकारने उत्तर द्यावे'', अशी मागणी वड्डेटीवारांनी केली. 

''मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होणारे, एकमेकांचे वैरी झालेत. हे कशाचे घोतक आहे. आज समाजातला सलोखा बिघडवण्याच काम सूरू आहे. जर तुम्ही खोटी आश्वासन देऊन फसवणूक केली नसतीत, तर  आज या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली नसती'', अशी टीका देखील वड्डेटीवार यांनी शिंदेंवर केली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'; 'या' जिल्ह्यांना 'अति मुसळधार'चा इशारा!

ओबीसी समुह एकत्र येत नाही याचा अर्थ असा नाही, आमचा कोणी गळा घोटून मारलं तरी आम्ही शांतपणे बसावे, आमच्या छातीवर बसून धिंगाना करावा. तसेच हे आंदोलन लवकर समाप्त करा कारण दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत चालला आहे, असे देखील वड्डेटीवार म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे,असा आरोप देखील वड्डेटीवार यांनी शिंदे सरकारवर केला. दरम्यान आंदोलने सगळ्यांची समान असतात. एका आंदोलनाला एक भूमिका दुसऱ्या आंदोलनाला दुसरी भूमिका कशी स्विकारता? आज आठवडा होऊन सुद्धा तुमचे हातपाय हलत नसतील तुमचे पाय जर आंदोलनस्थळी येत नसतील तर नेमकी तुमची भूमिका काय आहे? तुमच्या मनात काय आहे. हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे देखील वड्डेटीवार यांनी सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT