Shahaji Bapu Patil: '...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना सहन करतोय', शहाजीबापूंचं मोठं विधान!
Shahaji Bapu Patil On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती, महविकास आघाडीसह वंचित, मनसे, महापरिवर्तन आघाडी आणि इतर छोट्या पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरुवात केलीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शहाजी बापूंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
सांगोल्याच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली होती सडकून टीका
Shahaji Bapu Patil On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती, महविकास आघाडीसह वंचित, मनसे, महापरिवर्तन आघाडी आणि इतर छोट्या पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडण्यास सुरुवात केलीय. अशातच सांगोल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. दीपक साळुंखे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना रायगडावरील टकमक टोक दाखवायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी ठाकरेंना रोखठोक उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
''उद्धव ठाकरेंनी सभेत माझ्यावर टीका केली असेल. पण मी इथला विजयी उमेदवार आहे, ही त्यांची खात्री पटल्याने त्यांचा जळफलाट झालेला आहे". एकनाथ शिंदे 23 तारखेनंतर भांडी घासायला जाणार आहेत, असंही ठाकरे म्हणाले होते, यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, ''त्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून ते उठाव केलेल्या सर्व आमदारांविषयी नाराज आहेत. त्यामुळे ते आम्हाला नेहमीप्रमाणे जास्त बोलत आहेत. ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्याने आम्ही ते सहन करतोय. मी सांगोल्यात इतका विकास केला आहे की, उद्धव ठाकरेंना माझ्यावर टीका करण्यासारखं काहीच नाही".
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: '...तरच लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये'; अमित शाह नेमकं काय म्हणाले?
दीपक आबा साळुंखेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, "शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने शेतकरी कामगार पक्षावर केलेला हा अन्याय आहे. दीपक आबाचं आणि शिवसेनेचं अंधारातलं नातं दिसत आहे. त्यामुळे असं काही असावं. त्यांच्या सभेत बाहेरील लोक 50 टक्क्यांच्या वर होते. माझ्याविषयी ते काय बोलतात, हे माहिती करून घेण्यासाठी 20 टक्के जनता आली होती. राहिलेली 30 टक्के दीपक आबांची लोकं होती. ते जिथे जातात, तिथे प्रभावी नेत्यावरच टीका करतात".
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Mahayuti : 'कटेंगे तो बटेंगे'ला अजित पवार यांचा विरोध, मतांचं गणित जुळवण्यासाठी महायुतीचा प्लॅन?
उद्धव ठाकरेंनी सांगोल्याच्या सभेत शहाजी बापू पाटील यांच्यासह अमित शाहांवर निशाणा साधला होता. 'अमित शहांबद्दल बोलायचीच बात नाही. लगे रहो मुन्नाभाईच्या सर्कीटसारखं फिरत आहेत. 370 कलम काढलं, पण तुम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही. ज्यांनी हे कलम काढायला विरोध केला, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत, अशी टीका माझ्यावर करत आहेत. अमित शहाजी डोक्याला जरा ब्राम्ही तेल लावा. तुम्हाला स्मृतीभ्रंश झाला असेल, तर आठवण करून देतो की, 370 कलम हटवायला शिवसेनेनं तुम्हाला पाठिंबा दिला होता', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर खरमरीत टीका केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT