Sharad Pawar Baramati : आयुष्यात कधी कोर्टाची पायरी... पवार पक्षफुटीवर बोलले, अजित पवारांवर पहिला वार
अजित पवार यांच्याविरोधात मैदानात उतरलेल्या युगेंद्र पवार यांच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी पक्षफुटीच्या विषयावरुन भाजपवरही निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

युगेंद्र पवारांसाठी बारामतीत पहिलं भाषण

शरद पवारांचा थेट अजितदादांवर निशाणा

राष्ट्रवादी पक्षफुटीच्या मुद्द्यावर भाष्य
Sharad Pawar Sabha Baramati : उभ्या आयुष्यात कधी कोर्टात गेलो नव्हतो, कधी समन्सवर कोर्टात हजर राहिलो नाही असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटीच्या प्रकरणावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार आज युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीत पहिलंच भाषण करत आहेत. अजित पवार यांच्याविरोधात मैदानात उतरलेल्या युगेंद्र पवार यांच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी पक्षफुटीच्या विषयावरुन भाजपवरही निशाणा साधला आहे. (Sharad Pawar targets ajit pawar for splits in ncp and court case during baramati speech for yugendra pawar)
"मी उभारलेला पक्ष माझ्याकडून काढून घेतला, आमच्यावर केस केली, केंद्र सरकारमध्ये चक्र फिरली आणि आमचा पक्ष दुसऱ्यांकडे गेला. मी आयुष्यात कधी कोर्टात गेलो नव्हतो, कोर्टाच्या समन्सवर कोर्टात हजर राहिलो नव्हतो, पण पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो" असं म्हणत पवारांनी आपल्या मनातील सल व्यक्त केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केलाय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
हे ही वाचा >>Ajit Pawar Property : ट्रॅक्टर, ट्रेलर गाडी ते सोनं-चांदी... अब्जाधीश अजितदादांच्या संपत्तीमध्ये काय काय?
दरम्यान, अजित पवार यांनी कालच कन्हेरीमध्ये सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी भावनिक होत, जी चूक मी लोकसभेला केली, ती तुम्ही आता करतायत असं म्हणत पवारांवर निशाणा साधला होता. बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशातच अजित पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बारामतीकरांशी बोलताना अजित पवार भावुक झाले होते. ते म्हणाले, "जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो कसा चुकेल. मी मनाचा मोठेपणा दाखवला, ही माझी मोठी चूक झाली. तुम्हाला जो कौल द्यायचा तो तुम्ही दिला. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. हा तुमचा अधिकार आहे. मला माहितीय इथे बसणाऱ्यांनी सुप्रियाला (सुप्रिया सुळे) मतदान केलं. पण ठीक आहे, मला मान्य आहे. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा..असं त्यांनी ठरवलं आहे."
हे ही वाचा >>Amit Thackeray : पत्नी आणि मुलाच्या नावावर लाखो रुपये, सोनं; अमित ठाकरेंच्या नावावर किती कोटींची संपत्ती?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची काही वेळापूर्वीच पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये माढा, पंढरपूर, मोहोळ सारख्या महत्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. तर मुलूंडमधून संगिता वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पाचवी यादी जाहीर." असं ट्वीट करत ही यादी X वरुन जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता लगेच बारामतीच्या कन्हेरीमध्ये पवारांची ही सभा पाहायला मिळतेय. आजपासून शरद पवार यांच्या प्रचारसभांचा धडाका राज्यभरात पाहायला मिळणार आहे.