Sharad Pawar : बारामतीच्या कारभाऱ्यासाठी 30-30 चा फॉर्म्युला... अजित पवार यांना शह? काय म्हणाले शरद पवार?
बारामतीच्या सुपे गावात त्यांनी प्रचारसभा घेतली यावेळी यांनी पुढच्या तीस वर्षांसाठी युगेंद्र पवार यांची निवड केली आहे असे संकेत त्यांनी यावेळी उपस्थित बारामतीकरांना संबोधित करताना दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार यांच्याविरोधात पवारांचा पहिला डाव

अजित पवारांच्या अपयशाचा पाढा वाचला

नव्या कारभाऱ्यासाठी 30-30 चा फॉर्म्युला सांगितला
Sharad Pawar Speech Supe : शरद पवार हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. युगेंद्र पवार यांच्यासाठी ते रान पिंजून काढायला सुरूवात केली आहे. आज बारामतीच्या सुपे गावात त्यांनी प्रचारसभा घेतली यावेळी यांनी पुढच्या तीस वर्षांसाठी युगेंद्र पवार यांची निवड केली आहे, असे संकेत त्यांनी यावेळी उपस्थित बारामतीकरांना संबोधित करताना दिले आहेत.
पवारांनी सांगितलेला 30-30 फॉर्म्युला काय?
"1667 साली जनतेने मला निवडून दिलं, त्यानंतर मी तुमच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो, मंत्री झालो, चार वेळा मुख्यमंत्री झालो, केंद्राच्या संरक्षण आणि कृषी खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेवर आहे. मी लोकसभेला तुमच्या मतावर निवडून गेलो, पण एकदा ठरवलं की आता लोकसभा नाही. कारण तीस वर्ष सतत निवडून गेल्यावर आता नवी पिढी तयार केली पाहिजे असं वाटलं, त्यामुळे मी तीस वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला होता की, मी लोकसभेला जाणार नाही. मी इथलं राजकारण पाहणार नाही. इथली जबाबदारी मी अजित पवार यांच्यावर टाकली होती. त्यामुळे पहिले तीस वर्ष पाहिले मी, नंतरचे तीस वर्ष अजित पवार यांनी काम केलं. आता पुढच्या तीस वर्षांची व्यवस्था करायची आवश्यकता आहे" असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे भाकरी फिरवण्याचा इशारा दिला आहे. अर्थातच यंदा भाकरी फिरवणं म्हणजे बारामती विधानसभेचा कारभारी बदलण्याचे त्यांचे संकेत असणार आहेत.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी बारामतीमधील काम सोडल्यानंतर ज्यांच्यावर तीस वर्ष जबाबदारी दिली, त्यांच्यांकडून पाण्याच्या विषयावर विशेष लक्ष देण्याची अपेक्षा होती. राज्यात सरकार असताना पाण्यासाठी योजनेला मान्यता दिली, पण नंतरच्या काळात ज्या नेत्यांवर मी जबाबदारी दिली, दुर्दैवानं त्यांच्याकडून ते झालं नाही असं म्हणत अजित पवार यांनी काम न केल्याचंही पवारांनी अधोरेखित केलं.