बाळासाहेबांनी राजऐवजी उद्धव यांची का केली निवड?, ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितला किस्सा
Shiv Sena UBT: बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर का सोपावली याचा संपूर्ण किस्सा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात सांगितला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग
रतन टाटांची आठवण काढत उद्धव ठाकरेंनी सांगितला एक किस्सा
बाळासाहेबांनी आपली निवड का केली हेच सांगितलं उद्धव ठाकरेंनी
Uddhav Thackeray and Raj Thackeray: मुंबई: शिवसेनेत जेव्हा कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड झालेली तेव्हापासूनच पक्षात धुसफूस झाली होती. अनेकांनी असाही सवाल केला होता की, बाळासाहेबांनी राज ठाकरेंऐवजी उद्धव ठाकरेंची निवड का केली? आता देखील अनेकदा याबाबत सवाल विचार उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जातो. पण आज (12 ऑक्टोबर) अनेक वर्षांनी स्वत: उद्धव ठाकरेंनी या सगळ्याबाबतच एक किस्सा सांगत बाळासाहेबांनी केलेली निवड कशी योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. (shiv sena ubt dussehra melava why balasaheb thackeray chose uddhav instead of raj thackeray uddhav thackeray told the incident for first time)
ADVERTISEMENT
बाळासाहेबांनी शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्यावर सोपवावी अशी चर्चा अनेकदा झाली होती. पण उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ठाकरे कुटुंबात कलह झाला आणि त्याची परिणिती म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र, असं असलं तरी बाळासाहेबांनी जी निवड केली ती योग्यच होती असं खुद्द रतन टाटा यांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरेंनी आज जाहीर मेळाव्यात सांगितलं.
हे ही वाचा>> CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींनो! CM शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा
'...त्यानंतरच बाळासाहेबांनी तुझी निवड केली', टाटांचा तो किस्सा अन् उद्धव ठाकरे बरंच काही गेले बोलून
आपल्या भाषणात रतन टाटा यांची आठवण निघाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'टाटा साहेबांचीआठवण मुद्दाम सांगतो. शिवसेनाप्रमुख आपल्यातून गेल्यानंतर.. टाटा साहेब आमच्या घरी आले होते कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी. बराच वेळ बसले गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की, उद्धव एक लक्षात ठेव.. तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे.'
हे वाचलं का?
'तुला जसा शिवसेनाप्रमुखांचा वारसा लाभलाय तसा मला जेआरडी टाटांचा वारसा लाभलाय. जेआरडी यांच्यानंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्यांनी माझ्यावर हा संपूर्ण कारभार सोपवला.. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की, कोणताही निर्णय घेताना आज जेआरडी असते तर काय केलं असतं. त्यामुळे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो.'
हे ही वाचा>> Uddhav Thackeray : ''अदानी आमची जान, आणि आम्ही शेटजींचे...'', शिंदेंच्या जाहिरातीवर ठाकरेंची बोचरी टीका
'अचानक माझ्या लक्षात आलं की, अनेक वर्ष जेआरडी यांनी मला काम करताना बघितलंय, माझी शैली बघितली आहे. माझी पद्धत बघितली आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावर बसला की, माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर ही धुरा ठेवली. तसंच तुझं आहे...'
ADVERTISEMENT
'जशी माझी निवड जेआरडींनी केली तशी तुझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली. शिवसेनाप्रमुखांनी तुला बघितलं आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस.. तुझे निर्णय तू कसे घेतोस. हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की, हा माझा वारसा समर्थपणे घेऊन जाऊ शकेल. तेव्हाच त्यांनी तुझी निवड केली आहे. म्हणून तुला ज्या वेळेस योग्य वाटेल तेच तू कर. हेच शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत आहे.'
'तेच मी करतोय.. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व आहे म्हणून मी त्यांना लाथ घातली. भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदुत्व आहे म्हणून मी त्यांना लाथ घातली.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
या घटनेचा नेमका अर्थ काय?
2022 साली शिवसेनेत जी फूट पडली तेव्हापासून पुन्हा एकदा अनेकांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनेक विरोधकांनी त्यावेळी असंही म्हटलं होतं की, जर बाळासाहेबांनी पक्षाची धुरा राज ठाकरेंकडे सोपवली असती तर शिवसेनेत अशी फूट कधीच पडली नसती.
दरम्यान, या पद्धतीची जी टीका सातत्याने सुरू तिलाच उत्तर देण्यासाठी आज उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात हा किस्सा सांगितला असण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT