Uddhav Thackeray : ''अदानी आमची जान, आणि आम्ही शेटजींचे...'', शिंदेंच्या जाहिरातीवर ठाकरेंची बोचरी टीका
Uddhav Thackeray News : आज मी तुमची पूजा करतोय कारण तुम्ही माझं शस्त्र आहात. ही नसुती शिवसेना नाही तर वाघनखं आहेत,असे शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.तसेच जा त्या मिध्यांना सांगा तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही, अशी टीका देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
हे लांडगे आहेत.
वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करतायत.
याचा राजकारणातून शिरच्छेद करावाचं लागेल
Uddhav Thackeray criticize Eknath Shinde : दसरा मेळाव्यासाठी आज शिंदे सरकारने जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरात बाजीवरून ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान, आणि आमची शेटजींचे श्वान, अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंची खिल्ली उडवली आहे. (udhhav thackeray criticize cm eknath shinde dasara melava shivaji park maharashtra politics)
ADVERTISEMENT
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. आज मी तुमची पूजा करतोय कारण तुम्ही माझं शस्त्र आहात. ही नसुती शिवसेना नाही तर वाघनखं आहेत, असे शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.तसेच जा त्या मिध्यांना सांगा तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही, अशी टीका देखील ठाकरेंनी शिंदेवर केली.
हे ही वाचा : Eknath Shinde: "हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना...", दसरा मेळाव्यात CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आज त्यांनी जी एक जाहिरात केली आहे. 'हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण', पण पुढच्या ओळी काही बाकी आहेत. 'हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण',अदानी आमची जान, आणि आमची शेटजींचे श्वान,' अशा ठाकरेंनी जाहिरातीवरून शिंदेवर हल्ला चढवला आहे.हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इश्चित नाही. मी श्वान प्रेमी आहे. पण लांडगा प्रेमी नाही आहे. हे लांडगे आहेत. वाघाचं कातडं पांघरण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं काय काय उघड पडतंय, त्यांना माहित नाही आहे, असा हल्ला देखील ठाकरेंनी शिंदे सेनेवर चढवला आहे.
हे वाचलं का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर देखील स्वकीयच चालून आले होते. पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावर चालून आला, त्याचा शिरच्छेद केला. तशीच ही लोक आपल्या अंगावर चालून येतायत, याचा राजकारणातून शिरच्छेद करावाचं लागेल, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Shiv Sena UBT: 'खान डुलत डुलत आला, तसा हा गुजरातचा खान...', भास्कर जाधवांची अमित शाहांवर जहरी टीका
प्रत्येक जिह्यात छत्रपतींचे मंदिर बांधणार
भाजपने छत्रपतींचा पुतळा उभारलात. पण नालायकांनो तो उभारताना तुम्ही पैसा खाल्लात, आठ महिन्यांचा आत तो पुतळा कोसळतो आणि आम्ही त्याच्याहून मोठा पुतळा बांधू. म्हणजे पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात आम्ही पैसे घालू. आम्ही नुसते पुतळे नाही बांधत त्यांची पूजा करतो. आज मी तुम्हाला वचन देतो, आमचं सरकार आल्यावर प्रत्येक जिह्यात छत्रपतींचे मंदिर बांधणार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
तसेच टाटांनी रोजच्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. पण आताचे उद्योगपती हे पुर्ण मीठागर गिळतायत. भाजपला लाथ घातली कारण त्यांचं हिंदुत्व हे गोमुंत्र आणि बुरसटलेले आहे, असे देखील ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT