'DGP रश्मी शुक्लांची तात्काळ बदली करा', अचानक कसे आले बदलीचे आदेश?
Transfer DGP Rashmi Shukla: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात यावी असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. पण अचानक हे आदेश का देण्यात आले? असा सवाल आता विचारण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर रश्मी शुक्लांना मोठा धक्का
ऐन निवडणुकीदरम्यान आयोगाने दिलेल्या आदेशाने कोणाला बसणार धक्का?
DGP Rashmi Shukla: मुंबई: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तात्काळ बदली करण्याचे आदेश हे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. पण तरीही निवडणूक आयोगाने त्यासंबंधी कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र, आता मतदानाला अवघे 16 दिवस बाकी राहिलेले असताना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. (transfer dgp rashmi shukla immediately why the sudden order from the central election commission)
या आदेशानंतर आता तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलमधून नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे. मविआ सरकारच्या काळात रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते. हे आरोप सातत्याने सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तातडीने बदली करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
हे ही वाचा>> Nawab Malik : शिंदे-पवारांची चर्चा सुरू? विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला
दुसरीकडे संजय राऊत यांनीही रश्मी शुक्लांच्या बदलीची मागणी लावून धरली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शुक्लांची बदली करण्यात आली. 3 IPS अधिकाऱ्यांचं पॅनल तयार केलं जाणार आहे.
DGP रश्मी शुक्लांच्या बदलीमागचं नेमकं कारण काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जातात. त्यामुळेच त्यांना झुकतं माप दिल्याचा आरोप हा सात्त्याने विरोधकांकडून केला जात होता.










