Uddhav Thackeray: ' अमित शाह लगे रहो मुन्नाभाईच्या सर्कीटसारखं...', सांगोल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शहांवर साधला निशाणा

point

दिपक साळुंखे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

point

'महाराष्ट्राच्या कुशीवर त्यांनी वार केला आणि...'

Uddhav Thackeray On Amit Shah: "आमची मशाल अजून पेटली नाही. मग सगळ्यांचं सर्वच गरम होईल. आता पेटलेली मशाल धगधगत आहे. मी जिथे जातो तिथे तोबा गर्दी होते. लोक वाट बघत आहेत. जो गद्दारीचा वार त्यांनी केला, तो केवळ उद्धव ठाकरे, शिवसेनेवर नाही केला, तर आपली आई असलेल्या महाराष्ट्राच्या कुशीवर यांनी वार केला आहे. मोदी आणि शाह फिरत आहेत. अमित शहांबद्दल बोलायचीच बात नाही. लगे रहो मुन्नाभाईच्या सर्कीटसारखं फिरत आहेत. 370 कलम काढलं, पण तुम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही. ज्यांनी हे कलम काढायला विरोध केला, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत, अशी टीका माझ्यावर करत आहेत. अमित शहाजी डोक्याला जरा ब्राम्ही तेल लावा. तुम्हाला स्मृतीभ्रंश झाला असेल, तर आठवण करून देतो की, 370 कलम हटवायला शिवसेनेनं तुम्हाला पाठिंबा दिला होता", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते सांगोला येथे दिपक आबा साळुंखे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

ADVERTISEMENT

"आम्ही कुणासोबत बसतोय? काय करतोय, ही हेरगिरी करण्यापेक्षा एका गोष्टीचं उत्तर महाराष्ट्राला आणि देशाला द्या. जेव्हा काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार होत होते, त्यांची हत्या होत होती. अतिरेकी त्यांची घरं बळकावत होते. तेव्हा मोदी आणि शाह हे नाव त्यांच्या घराबाहेर कुणाला माहित नव्हतं. त्या काळात फक्त आणि फक्त हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. बाळासाहेब पंतप्रधान नव्हते. तुम्ही शेतकरी, माता-भगिनींसमोर 370 कलम काढल्याचा डंका पिटत आहात", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा >>  Amit Shah : "आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पण निवडणुकीनंतर...", अमित शाह 'हे' काय बोलून गेले

मोदी-शाहंवर टीका करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "370 कलम काढून किती वर्षे झाली. आपल्याकडे काहीही नव्हतं, तेव्हा काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला, मग पंतप्रधानपदी मोदी बसलेत आणि गृहमंत्री म्हणून अमित शहा तुम्ही बसला आहात, 370 कलम काढल्यानंतर किती काश्मीरी पंडितांना तुम्ही घरी घेऊन गेलात? हे तुम्ही मला आधी सांगा. मग तुमचा डंका पिटा." आज महाराष्ट्रातील जनता रोजगार मागते. तुम्ही सांगता 370 कलम हटवलं. महाराष्ट्राची जनता, शेतकरी हमीभाव मागतात. तुम्ही सांगताय राम मंदिर बांधलं. राम मंदिर बांधताना आम्ही तुमच्यासोबत नव्हतो का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> MVA Manifesto: महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना किती रुपये मिळणार? मविआचा जाहीरनामा पाहिलात का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT