Uddhav Thackeray Pune : "बाबांच्या आंदोलनात जिंकलेले लोकही येतायत, म्हणजे त्यांचाही निकालावर विश्वास नाही"

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात बाबा आढाव यांचं आंदोलन

point

बाबा आढाव यांच्या भेटीला उद्धव ठाकरे

point

संजय राऊत, सुष्मा अंधारेही भेटीला

राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून EVM वर शंका उपस्थित केली जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी निवडणुकीत झालेल्या पैशांच्या गैरवापरावरुन आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आज उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. पुण्यात सुरू असलेल्या या आंदोलनाला ठाकरेंनी भेट दिली, त्यावेळी त्यांच्या सोबत संजय राऊत, सुषमा अंधारे या देखील उपस्थित होत्या. यावेळी उजद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आणि राज्यभर हे आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करेन असा शब्द बाबा आढाव यांना दिला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sharad Pawar : "एवढं स्पष्ट बहुमत मिळूनही जर..." पुण्यात शरद पवारांचं मोठं विधान

सत्यमेव जयते असं म्हणतात पण आता सत्तामेव जयते सुरू झालं आहे. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, तसं हे आंदोलन आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. योदनांचा पाऊस पडला, पैसा वापरला गेला. या सरकारने योजनांच्या मार्फत पैसे देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं. EVM वर शंका उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही लोकांना शेतात पूजा-आर्चा करायला का जावं लागतं? असं म्हणत ठाकरेंनी शिदेंवर निशाणा साधला. राजभवनावर जाण्याऐवजी अमावस्येच्या मुहूर्तावर शेतात का जातायत असा खोचक सवाल ठाकरेंनी केलं. तसंच बाबा आढाव यांना आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही आत्मक्लेष करुन घेऊ नका, हा सर्वांचा आत्मक्लेष आहे. तसंच तुमचं आंदोलन महाविकास आघाडी पुढे घेऊन जाईल, तुम्ही हा आत्मक्लेष थांबवा असं आवाहन ठाकरेंनी केलं. 

उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील इथे येण्यापूर्वी अजित पवार यांनी या आंदोलनाला भेट देण्यापूर्वी अजित पवारही इथे भेट देऊन गेले होते. त्यावर ठाकरेंनी मारला. इथे जिंकलेलेही येतायत आणि पराभूत झालेलेही येतायत, त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्यांचाही जिंकलेल्या लोकांचाही आणि हरलेल्या लोकांचाही या निकालावर विश्वास नाही असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला. 

हे वाचलं का?

बाबा आढाव यांची अदानींवर सडकून टीका 

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट, म्हणाले,  "त्यावेळी EVM बद्दल कोणी..."

बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलताना अदानींवर निशाणा साधला. या निवडणुकीत परकीय शक्तिंचा आणि  अदानी सारख्या लोकांचा वापर झाला, पण अदानींचं कुणी नावंही घेत नाही असं बाबा आढाव म्हणालेत. एकच पक्ष आणि एकच नेता हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं धोरण आहे, त्यांना जनतेत घेऊन जायचंय असं म्हणत बाबा आढाव यांनी परखड भाष्य केलं. बटेंगे तो कटेंगे वगैरे नाऱ्यांवरही बाबा आढाव यांनी टीका केली. अदानीच्या शेअर्सचे भाव ढासळले, त्या अदानीला मुंबई काबीज करायची आहे, दुनिया काबीज करायची आहे असं बाबा आढाव म्हणाले. तसंच उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT